जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक दिन नाव श्री नागेश विद्यालयात विद्यार्थ्यांपासून “प्रजासत्ताक दिन ” नाव तयार करून देशाला दिली मांवनदना.

0
203

जामखेड न्युज——

जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक दिन नाव

श्री नागेश विद्यालयात विद्यार्थ्यांपासून “प्रजासत्ताक दिन ” नाव तयार करून देशाला दिली मांवनदना.

 

एक हजार विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातात धरून साकारले “प्रजासत्ताक दिन ” नाव

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये 26 जानेवारी 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जगातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठे विद्यार्थ्यांपासून तयार केलेले प्रजासत्ताक दिन नाव श्री नागेश विद्यालय साकारण्यात आले .


देशाला 1000 विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन “प्रजासत्ताक दिन “नाव साकारून मानवंदना दिली.
विद्यालयाचे ध्वजारोहण प्राचार्य मडके बी के यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे नागेश विद्यालय युनिट उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना दिली.
” प्रजासत्ताक दिन ” या नावाची लांबी 150 फूट व रुंदी 70 फूट असून 10500 स्क्वेअर फुट मध्ये नागेश विद्यालयातील 500 विद्यार्थी कन्या विद्यालयातील 500 विद्यार्थीनी व एनसीसी कॅडेट यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. हे नाव नागेश विद्यालयातील कलाशिक्षक तथा एन सी सी ऑफिसर मयूर भोसले यांनी तयार केले त्यांना विद्यालयातील शिक्षक व एनसीसी कॅडेट्स यांचे सहकार्य लाभले. हे नाव अवघ्या दोन तासात तयार झाले.
प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम संपन्न झाला.

यावेळी प्रमुख उपस्थिती नागेश स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष मधुकर राळेभात , रा कॉ प्रदेश चिटणीस स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र कोठारी ,स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत, स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, नागेश विद्यालयाचे माजी विद्यार्थी बी एस एफ अधिकारी सुरेश गोसावी, शहीद गणेश भोसले यांचे वडील कृष्णाजी भोसले, उपप्राचार्य तांबे पी ए, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अशोक यादव , गुरुकुल प्रमुख संतोष ससाने ,विनोद सासवडकर, रमेश बोलभट एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, बाबासाहेब घोलप,माजी प्रा सुभाष फाळके, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर,माजी प्राचार्य साखरे, कुंडल राळेभात,संभाजी इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.


विविध प्रकारचे ध्वज तयार करणारे राधिका इंटरप्राईजेस चे संचालक बाबा घोलप यांनी एक हजार ध्वज विद्यार्थ्यांना मोफत दिले.

महाराष्ट्रातील व जगातील सर्वात मोठे विद्यार्थ्यांपासून साकारलेले ” प्रजासत्ताक दिन “नाव रयतेच्या श्री नागेश विद्यालय तयार झाले याबद्दल सर्व जामखेड करा कडून कौतुक होत आहे.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित दादा पवार ,विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेकर, काकासाहेब वाळुंजकर , शिवाजी तापकीर यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले.

हे नाव पाहण्यासाठी विद्यालयांमध्ये ग्रामस्थ,पालक शिक्षक,माता भगिनी, माजी सैनिक यांनी हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here