जामखेड न्युज——
देशसेवकाच्या हस्ते साकत सेवा संस्थेचे ध्वजारोहण
साकत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे ध्वजारोहण देशसेवक हरिदास वराट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी साकत सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रा. अरूण वराट, सरपंच हनुमंत पाटील, मुख्याध्यापक दत्ता काळे, माजी चेअरमन हनुमंत वराट, पोलीस पाटील महादेव वराट, माजी सरपंच हरिभाऊ मुरूमकर,उपसरपंच राजाभाऊ वराट, संचालक नानासाहेब लहाने, महादेव वराट, पोपट वराट, भाऊसाहेब पुलवळे, नाशिक लहाने, पांडुरंग सानप, गणेश वराट, युवराज वराट, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, नागेश वराट, विठ्ठल वराट, दिनकर मुरूमकर, सचिव दादासाहेब मेंढकर, जिल्हा परिषद, श्री साकेश्वर विद्यालय येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी गावातून आल्यावर ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच मनिषा पाटील यांच्या हस्ते झाले नंतर साकत सेवा संस्थेचे ध्वजारोहण देशसेवक हरिदास वराट यांच्या हस्ते करण्यात आले.
हरिदास वराट हे लान्स हवालदार पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सन्मान म्हणून साकत सेवा संस्थेने त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले व सत्कार करण्यात आला.