जामखेड न्युज——
दोन्ही आमदारांचे राज्यात नाव पण जामखेड येण्यासाठी धड रस्ता नाही – विश्वासराव आरोटे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जामखेड शाखेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

कर्जत जामखेडच्या दोन्ही आमदरांचे राज्यात नाव आहे. सगळीकडे दबदबा आहे पण जामखेडला येण्यासाठी रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळत नाही एकदा एखादा पाहुणा आला तर परत आयुष्यात जामखेडला नको रे बाबा असे म्हणेल तुमचे आमदार राज्यात डंका पिटवतात पण धड रस्ता नाही हे मोठे दुर्दैव आहे असे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जामखेड शाखेच्या वतीने आयोजित आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक, पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक, शासकीय अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी असलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळा मा. डॉ. विश्वासराव आरोटे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या शुभहस्तेआयोजित करण्यात आला होता यासाठी अध्यक्ष म्हणून कार्यक्षम नगरसेवक अमित चिंतामणी होते. यावेळी फायकअली सय्यद, दत्तात्रय राऊत, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, मुख्याध्यापिका मीना राळेभात, गुलाब जांभळे, उत्तम बोडखे, संतोष दाणी, लाड, जगताप, पोकळे, अशोक वीर, सत्तार शेख, पाराजी टेमकर, अविनाश बोधले,किरण रेडे, संजय वारभोग, संतोष बारगजे, पप्पू सय्यद, संतोष गर्जे, राजू भोगील, श्वेता गायकवाड, अनिल धोत्रे, अजय अवसरे यांच्या सह आष्टी, करमाळा, जामखेड परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील हनुमंत निर्मळ जेऊर, आष्टीचे प्रफुल्ल सहस्रबुद्धे ज्येष्ठ पत्रकार, राम ढेपे शाखा अभियंता जामखेड, गफ्फार पठाण समाजसेवा, विजय काळे शिक्षक लोकमान्य शाळा या पंच रत्नांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना आरोटे म्हणाले की, जामखेड मधील पत्रकारांनी जनतेला बरोबर घेऊन लोकप्रतिनिधींना जागा दाखवली पाहिजे. पत्रकारांनी ऐंशी टक्के पत्रकारीता करावी याबरोबरच वीस टक्के समाजसेवाही करावी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे काम चार राज्यात आहे सत्तावीस हजार सभासद आहेत. पत्रकारांनी गट तट बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा आपल्या लिखाणातून वंचित घटकांना न्याय मिळवून द्यावा, संघटनेत लोकसेवक म्हणून काम करावे, पत्रकारितेच्या माध्यमातून कोणाचे आयुष्य उधवस्त होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित चिंतामणी म्हणाले की,
पत्रकारांकडून सन्मान होत आहे हा सर्वात मोठा सन्मान आहे. या व्यक्तीचे आपापल्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. आता सन्मानामुळे यांना काम करण्यासाठी अधिक उर्जा मिळेल असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना प्रफुल्ल सहस्रबुद्धे म्हणाले की, पुरस्कारामुळे मित्राने कौतुकाची थाप दिली आहे. आपले क्षेत्र ठरवून स्विकारले पाहिजे म्हणजे मनासारखे काम करता येते. पत्रकारितेत पन्नास टक्के महिलांचा सहभाग असावा म्हणजे समाजाचे खरे चित्र समाजापुढे येईल, सन्मान हा कर्तृत्वाचा असतो माणुसकी हा घटक महत्त्वाचा आहे. आपल्या अंगातील कला आपण योग्य पद्धतीने मांडता आली पाहिजे. यावेळी फायकअली सय्यद, दत्तात्रय राऊत, उत्तम बोडखे, संतोष दाणी, सुदाम वराट, राम ढेपे, विजय काळे, मीना राळेभात यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण रेडे यांनी तर आभार अविनाश बोधले यांनी मानले.




