जामखेड न्युज——
श्री स्वामी अमृत भारती विद्यालयाची कौतुकास्पद कामगिरी राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत गगन भरारी
राष्ट्रीय रंगोत्सव सेलीब्रेशन आर्ट ऑर्गनायजेशन मुंबई या संस्थेच्या वतीने दिनांक ३ ऑगस्ट २०२२
ला पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील श्री स्वामी अमृत भारती विद्यालयात राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेचा निकाल ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्डब्रेक यश संपादन करून घवघवीत यश मिळवून १० सुवर्ण पदक, ५ कास्य पदक व २ ट्रोफी मिळवली तसेच यशस्वी विद्यार्थ्यांची निवड पुढील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून
कौतुक होत आहे. चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १५ नोव्हेंबर २०२२ मंगळवार रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए.एम.पवार, तर प्रमुख पाहुणे श्री पी.के. जावळे हे होते. याप्रसंगी मुख्याध्यापक ए.एम. पवार व कला शिक्षक श्री बी.एस, बांडराव यांना कलाभूषण पुरस्कार व मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
रंगोत्सव चित्रकला स्पर्धेमधून राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कुमारी
सृष्टी बांडराव इयत्ता ५ वी स्केचिंग (गोल्ड मेडल अवार्ड), कुमारी भाग्यश्री पवार इयत्ता ५ वी कलरिंग
(ट्रोफी), कुमारी नेत्राली लाड इयत्ता ५ वी कोलाज (सिल्व्हर मेडल), कुमारी अर्चना जाधव इयत्ता ६ वी
हस्ताक्षर (गोल्ड मेडल अवार्ड), कुमार स्वप्नील फुलमाळी इयत्ता ७ वी हस्ताक्षर (गोल्ड मेडल), कुमारी प्रियांका पवार इयत्ता ७ वी कलरिंग (सिल्व्हर मेडल), कुमार शिवानंद राउत इयत्ता ८ वी स्केचिंग (गोल्ड मेडल), कुमारी प्रतीक्षा हरिदास पवार इयत्ता ८ वी कलरिंग (सिल्व्हर मेडल), हस्ताक्षर (गोल्ड मेडल), कुमारी अंजली वाल्हेकर इयत्ता ९ वी कलरिंग, हस्ताक्षर, स्केचिंग, (सरप्राईज गिफ्ट, गोल्ड मेडल), कुमारी पायल पवार इयत्ता १० वी कलरिंग, स्केचिंग (ट्रोफी, गोल्ड मेडल), कुमार अथर्व पवार इयत्ता १० वी हस्ताक्षर (गोल्ड मेडल), कुमारी प्रियांका पवार इयत्ता १० वी कोलाज (गोल्ड मेडल), कुमारी भाग्यश्री जायभाये इयत्ता १२ वी
हस्ताक्षर, स्केचिंग (गोल्ड मेडल) पदक पटकावले.
राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेचे आयोजन व तयारी श्री बांडराव सर यांनी अथक परिश्रम घेतले होते.
यासाठी मुख्याध्यापक पवार सर यांचे अनमोल सहकार्य लाभले. या स्पर्धेत देशपातळीवर यश संपादित केल्याबद्दल विध्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष महंत गुरुवर्य ह.भ.प.महादेवानंद भारती महाराज, सचिव, सदस्यासह ह.भ.प.परमानंद भारती महाराज, मुख्याध्यापक ए.एम. पवार, कला शिक्षक बांडराव सर, जावळे सर, नजान सर, भोसले सर, डांभे सर, जरे सर, मुळे सर, लाड सर, डिसले सर, प्रताप पवार सर, अक्षय शिंदे सर, अर्जुन भणगे सर, वालेकर सर, श्रीमती पोकळे, श्रीमती गाडे, श्री बजगुडे महाराज, बिबिषण पवार, छगन गाडे, महादेव धनवडे आदि सह सरपंच व सप्तक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार व पालकांनी कौतुक करून अभिनंदन केले.