जामखेड न्युज——
स्व. एम. ई. भोरे ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखेसाठी २० टक्के तर कला शाखेसाठी ४० टक्के अनुदान
जामखेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या पाडळी येथील सनराईज शैक्षणिक संकुलाच्या जामखेड तालुक्यातील पाडळी येथील साहेबराव पाटील माध्यमिक शाळा, स्व. एम. ई. भोरे ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखेसाठी २० टक्के तर कला शाखेसाठी ४० टक्के अनुदानास पात्र ठरली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्यातील पाडळी फाटा येथील सनराईज एज्युकेशन फौंडेशन जामखेड संचलित सनराईज शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून पाडळी येथील साहेबराव पाटील माध्यमिक शाळा, स्व. एम. ई. भोरे ज्युनियर कॉलेज (अनुदानित), सनराईज इंग्लिश स्कूल, संभाजीराजे ज्युनियर कॉलेज, देवदैठण व स्व. विठ्ठल भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय, कुसडगाव अशा विविध शाखांच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणच्या व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्या बाबत अग्रेसर असलेल्या सनराईज शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून सनराईज एज्युकेशन फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे हे गेली अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात शैक्षणिक कार्य करत आहेत. या त्यांच्या कामाला मोठे यश आले आहे.
एकंदर त्यांनी केलेल्या कामास फळ म्हणून मंत्रालय मुंबई येथून आज दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर झालेल्या यादी नुसार संस्थेच्या पाडळी येथील साहेबराव पाटील माध्यमिक शाळा, स्व. एम. ई. भोरे ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखेसाठी २० टक्के तर कला शाखेसाठी ४० टक्के अनुदानास पात्र ठरले आहे. याबाबतची घोषणा संबंधित विभागाचे अवर सचिवाकडुन जाहीर करण्यात आली असून अनुदानास पात्र संस्थांची यादी संबंधित वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एकंदर महाराष्ट्रातील अशा अनुदानस पात्र संस्थांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कॅबीनेटमध्ये शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी जाहीर केल्यानुसार ११६० कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे. या पात्रता यादी नुसार स्व. एम. ई. भोरे ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखेसाठी २० टक्के तर कला शाखेसाठी ४० टक्के अनुदानास पात्र ठरली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी दिली आहे.
संस्थेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच शाळेतील विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांच्या आनंदाला उधाण आले आहे.