Thursday, February 12, 2026
Home राजकारण मंत्री सत्तारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक वरिष्ठांशी बोलून...

मंत्री सत्तारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक वरिष्ठांशी बोलून योग्य कारवाई करणार -पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

0
279

जामखेड न्युज——

मंत्री सत्तारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

वरिष्ठांशी बोलून योग्य कारवाई करणार -पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे पण मंत्र्यांच्या बेताल वक्तव्य करत कुठे चाललाय महाराष्ट्र मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वतः दोन मुली सीईटीत घोटाळा करत नोकरी मिळवली आहेत अशा मंत्र्याला भाजपा पाठिशी घातल आहे. भाजपाने तत्व पायदळी तुडवले आहेत. सत्तारांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी व जामखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांनी केली.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले याबद्दल जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने काल खर्डा चौकात सत्तारांचा निषेध करत पुतळा जाळला होता आणी आज जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनला अब्दुल सत्तार यांच्या वर गुन्हा दाखल करावा यासाठी आक्रमक झाले होते.

यावेळी कर्जत जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, माजी सभापती संजय वराट, रमेश आजबे, जिल्हा चिटणीस राजेंद्र पवार, राहुल आहेर, शहाजी राळेभात, उमर कुरेशी, वैजनाथ पोले, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, नगरसेवक  मोहन पवार, जुबेर शेख, महेश राळेभात, अमोल गिरमे, राजू गोरे, अमर चाऊस, इस्माईल सय्यद, वसीम सय्यद, पांडुरंग मगर,सरपंच काकासाहेब चव्हाण, सचिन घुमरे, सरपंच निलेश पवार, अमित जाधव, निखिल घायतडक,  बजिरंग डुचे, अवधूत पवार, हरीभाऊ आजबे यांच्या सह मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्तारांविरोधात अनेक घोषणा दिल्या

“निम का पत्ता कडवा है अब्दुल सत्तार भडवा है”

“अब्दुल सत्तारांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय”

“टोपी खाली दडलय काय पन्नास खोके हाय हाय”

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश भोसले
म्हणाले की, सत्तारांना सत्तेचा माज आहे. चांगल्या माणसाबद्दल बोलणे योग्य नाही. सत्तारांवर कायदेशीर गुन्हा नोंदवावा जाहीर निषेध व्यक्त करत
मंत्रीपदाची शपथे घेतली त्यांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे जाहीर निषेध व्यक्त केला.
तसेच सत्तार यांना जामखेड तालुक्यात फिरू देणार नाहीत असा इशारा देण्यात आला.

यावेळी बोलताना जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट म्हणाले की, खासदार
संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही पवार साहेबांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. सत्तारांचा राजकीय मागासलेपणा दिसत आहे. सरकारने ताबडतोब सत्तारांचा राजीनामा घ्यावा असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा जाहीर निषेध करत सत्तारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. असेही सांगितले.

यावेळी दत्तात्रय वारे, सरपंच निलेश पवार, वैजनाथ पोले, शरद शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी महाविकास आघाडी सरपंचांच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, वरिष्ठांशी बोलून पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!