नाहुलीत उद्या नेत्यांची मांदियाळी! सचिन नानांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात जामखेडमधील दिग्गज एकाच मंचावर! सभापती प्रा. राम शिंदे व वैराग्यमूर्ती कैलास महाराज भोरे यांची प्रमुख उपस्थिती, चेअरमन, संचालक, नगराध्यक्ष, नगरसेवकांचा जाहीर सन्मान!
नाहुलीत उद्या नेत्यांची मांदियाळी! सचिन नानांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात जामखेडमधील दिग्गज एकाच मंचावर!
सभापती प्रा. राम शिंदे व वैराग्यमूर्ती कैलास महाराज भोरे यांची प्रमुख उपस्थिती, चेअरमन, संचालक, नगराध्यक्ष, नगरसेवकांचा जाहीर सन्मान!
जामखेड तालुक्याच्या सहकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेडचे संचालक सचिन (नाना) घुमरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नाहुली येथे मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जामखेड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, राजकीय नेते आणि कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे जामखेड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ठरावधारक व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळ तसेच जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांचा जाहीर आभार प्रदर्शन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राम शिंदे साहेबांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. तसेच ह.भ.प. वैराग्यमूर्ती कैलास महाराज भोरे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सहकार, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जामखेड तालुक्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे पदाधिकारी, बाजार समितीचे लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेतील पदाधिकारी व नगरसेवक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.
सचिन (नाना) घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्याला तालुक्यातील विविध गावांतील कार्यकर्ते, हितचिंतक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
आयोजक : समस्त ग्रामस्थ नाहुली व सचिन (नाना) घुमरे प्रतिष्ठान. स्थळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाहुली, ता. जामखेड. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जामखेड तालुक्यातील सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध पदाधिकाऱ्यांचा एकत्रित सन्मान होणार असल्याने नाहुलीतील या सोहळ्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सचिन (नाना) घुमरे यांना अभिष्टचिंतन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.