Thursday, February 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या जामखेड महाविद्यालयातील प्राध्यापक ऋषिकेश देशमुख तिसऱ्यांदा नेट परीक्षा उत्तीर्ण

जामखेड महाविद्यालयातील प्राध्यापक ऋषिकेश देशमुख तिसऱ्यांदा नेट परीक्षा उत्तीर्ण

0
294

जामखेड न्युज – – – –

जामखेड महाविद्यालयातील ऋषिकेश देशमुख तिसऱ्यांदा नेट परीक्षा उत्तीर्ण!!! 

 

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालय जामखेड येथिल काॅमर्स विभागातील प्राध्यापक ऋषिकेश शशिकांत देशमुख हे प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी नेट परीक्षा तिसऱ्यांदा उतीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ऋषिकेश देशमुख हे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांचे चिरंजीव आहेत. २०२० पासून ते जामखेड महाविद्यालय जामखेड येथे काॅमर्स विभागात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.

ऋषिकेश देशमुख यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख, अध्यक्ष उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे, संचालक अशोक शिंगवी, सह सर्व संचालक तसेच प्राचार्य महालिंग डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनील नरके,

वाणिज्य विभागप्रमुख दिलीप काळे, जामखेड न्यूजचे संपादक सुदाम वराट सह सर्व प्राध्यापक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!