Friday, November 6, 2026
Home राजकारण जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली! चौंडीत विखे पाटील–राम शिंदे यांची बंद...

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली! चौंडीत विखे पाटील–राम शिंदे यांची बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण! अध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी खलबते? फडणवीसांच्या भेटीनंतर विखे पाटील थेट चौंडीत, जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित चर्चेत!

0
3
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली! चौंडीत विखे पाटील–राम शिंदे यांची बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!  अध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी खलबते? फडणवीसांच्या भेटीनंतर विखे पाटील थेट चौंडीत, जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित चर्चेत!

जामखेड न्युज – – – – – 

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली! चौंडीत विखे पाटील–राम शिंदे यांची बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

अध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी खलबते? फडणवीसांच्या भेटीनंतर विखे पाटील थेट चौंडीत, जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित चर्चेत!

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चौंडी येथील भेटीने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुपारी चौंडी येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, कालच सभापती प्रा. राम शिंदे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री विखे पाटील यांनी चौंडी गाठल्याने या भेटीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेली रस्सीखेच, विविध नेत्यांची भूमिका आणि संभाव्य राजकीय समीकरणे यावर या भेटीत चर्चा झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी नेत्यांमधील या भेटीगाठींमुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चौंडीतील भेटीनंतर आता मुख्यमंत्री कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एकीकडे २१ पैकी १८ जागांवरील विजयाचे राजकीय गणित, तर दुसरीकडे अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या हालचाली! चौंडीतील भेटीने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स आणखी वाढवला आहे. आता अध्यक्षपदाची खुर्ची नेमकी कोणाला मिळणार, याचीच जिल्हाभर चर्चा रंगली आहे.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी १२ नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात येणार आहे.

– संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल ३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला
– अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
– एकमत न झाल्यास त्याच सभेत मतदानाने निवड होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!