धुळ व खड्डयामुळे जामखेडकर हैराण महामार्गाच्या कामालाही लागेना मुहूर्त!!!

0
240

 

जामखेड न्युज——

धुळ व खड्डयामुळे जामखेडकर हैराण
महामार्गाच्या कामालाही लागेना मुहूर्त!!!

मराठवाड्याचे प्रवेशद्वार तसेच चांगली व्यापारी पेठ म्हणून जामखेड शहराकडे पाहिले जाते. पण सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे तसेच शहरात व शहराबाहेरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत त्यामुळे जामखेडला जायचेच नको असे बहुसंख्य लोक म्हणू लागले आहेत. तसेच गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग होणार असे सांगितले जात आहे पण अद्यापही महामार्गाला मुहूर्त लागलेला नाही. यात मात्र जामखेड शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सध्या हिवाळ्याच्या कोरड्या वातावरणात देखील अगदी छोट्या वाहनांच्या वर्दळीनेही धुळीचे लोट उडताना दिसत आहेत. परिणामी नागरिक धुळीपासून होणाऱ्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. सध्या धुळीपासून संरक्षण व्हावे म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील रस्त्यावर सकाळी व सायंकाळी टँकर द्वारे पाणी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे.

शहरातून तसेच शहराबाहेरील रस्ते उखडले आहेत. त्यातील मातीमिश्रीत मुरूम टाकल्याने रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती हवेत मिसळून धुळीचे लोट उठत आहेत. वाढत्या धुळीमुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाच सोबत रुमाल, डोळ्यावर गॉगल घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे़.

नगर, बीड, खर्डा रस्ता परिसरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्या तसेच दुकानात मोठ्या प्रमाणावर धुळीचा थर साचलेला असतो. याचा त्रास दुकानदाराबरोबरच सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.राष्ट्रीय महामार्ग रस्ता कामाचे टेंडर झाले आहे सुमारे दिड महिन्यापासून रोज मोजमाप सुरू आहे पण अद्याप कसलेही काम सुरू नाही.

पावसाने बीड ते नगर रस्ता सौताडा ते चिंचपूर चाळणी झाली आहे जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षापासून रस्ता झालेला नाही.विश्रामगृह ते कोठारी पेट्रोल पंप पर्यंत तर रस्त्यावर तिन्ही ऋतूमध्ये पाणीच असते, अनेक ठिकाणचे ड्रेनेज तसेच वांशिग सेंटररचे पाणी रस्त्यावर असते त्यात मोठ मोठे खड्डे यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास, सहन करावा लागत आहे.सर्वसामान्य लोक म्हणतात दोन आमदार एक खासदार असुन काय उपयोग रस्त्यावर मोठ मोठे खड्डे खड्यात पाणी तसेच इतर ठिकाणी धुळ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आमदार रोहित पवार यांनी यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, अभियंता, ठेकेदार यांची बैठक घेऊन दिवाळी नंतर अतिक्रमण हटवू असे ठरले होते. अतिक्रमण व पुनर्वसन यावर चर्चा होणार होती पण आता दिवाळी होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप काहीही हालचाल दिसत नाही नागरिकांना मात्र धुळिचा व खड्याचा प्रंचड त्रास सहन करावा लागत आहे.

वाहन चालकासोबत पादचाऱ्यांना धूळ आणि वाहनांच्या धुराचा सामना करावा लागत आहे. धुळीचे कण चालकाच्या डोळ्यात गेल्यामुळे अनेक वाहनांना अपघात होऊन ते खड्यात जाऊन उलटण्याच्या घटना घडल्या. धुळीचा रस्त्यावर तर त्रास होतोच, शिवाय स्थानिक दुकानदारांच्या दुकानात देखील धूळ साचल्याने, व्यावसायिक बेजार झाले आहेत. या धुळीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन काही व्यावसायिकांचे धुळीमुळे डोळे आले आहेत. धुलीकणांच्या तीव्रतेेमुळे नागरिकांना कायमची सर्दी होऊन त्याची ऍलर्जी होण्याची शक्यता आहे. श्‍वसनांचे विकार होऊन यामुळे फुफ्पुसांना त्रास होणे, दमा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाकातोंडातून धुलीकण आत गेल्याने आधीच दमा असलेल्या रुग्णांना याचा त्रास वाढत आहे. अनेकांचे डोळे सुजून खाज निर्माण होणे, डोळे लाल होणे, त्वचेचे आजार होणे यासारख्या अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here