Tuesday, March 31, 2026
Home क्राईम न्यूज जामखेड शहरातील बीड रोडवरील कॅफे सेंटर वर उपविभागीय पोलीस विभागाची धाड, एक...

जामखेड शहरातील बीड रोडवरील कॅफे सेंटर वर उपविभागीय पोलीस विभागाची धाड, एक जणांवर गुन्हा दाखल

0
2

जामखेड न्युज—–

जामखेड शहरातील बीड रोडवरील कॅफे सेंटर वर उपविभागीय पोलीस विभागाची धाड, एक जणांवर गुन्हा दाखल

 

जामखेड शहरातील बीड रोडवरील कॅफे चेस येथे सार्वजनिक ठिकाणी बंदिस्त रुममध्ये वेगवेगळे पार्टीशन करुन अश्लील चाळे करण्याचे उद्देशाने स्वतःचे आर्थिक फायद्या करिता भाड्याने कंपार्टमेंट देवुन व्यवस्था केली होती. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवून इतरांना त्रास दिला जात होता अशा आशयाची तक्रार होती. याची दखल घेत कर्जत उपविभागीय पोलीस विभागाने वरील कारवाई केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

   

पोलीस कॉन्स्टेबल मनोज लातूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड रोडवरील कॅफे चेसचे राहुल संदिप श्रीरामे (वय २५) रा. बटेवाडी जामखेड यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 294 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार बबन मखरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भैलुमे, महिला पोलीस कॉन्स्टेबल वनमाला तोडमल, पोलीस कॉन्स्टेबल मनोज लातूरकर यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.

जामखेड शहरात बीड रोडवरील कॅफे च्या नावाखाली अश्लीलता पसरवून इतरांना त्रास दिला जात होता अशा आशयाची तक्रार होती. याची दखल घेत कर्जत उपविभागीय पोलीस विभागाने कारवाई केली आहे. यामुळे परिसरातील कँफे सेंटरचे धाबे दणाणले आहेत.

वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. डी. कदम करत आहेत.

     
चौकट
शहरात सध्या कॅफे हाऊसच्या नावाखाली अश्लील चाळे आणि अनैतिक कृत्ये सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या गोरखधंद्यामुळे सुजाण नागरिक आणि पालकांमध्ये संतापाची लाट होती. या प्रकारांना कोणाचा छुपा पाठिंबा आहे का ? पोलीसांनी अशा अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होती. या तक्रारी च्या पाश्वभूमीवर वरील कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!