Tuesday, March 31, 2026
Home ताज्या बातम्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची सात महिन्यात पुन्हा बदली, २१ वर्षात २४...

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची सात महिन्यात पुन्हा बदली, २१ वर्षात २४ वी बदली

0
7

जामखेड न्युज—–

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची सात महिन्यात पुन्हा बदली, २१ वर्षात २४ वी बदली

कडक शिस्तीचे आणि परिणामकारक प्रशासनासाठी ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची सात महिन्यात पुन्हा बदली झाली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांना अपंग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नेमण्यात आले होते, तर आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल व वन विभागाचे सचिव या पदावर करण्यात आली.

२१ वर्षात २४ वी बदली २१ वर्षांच्या कारकिर्दीत ही त्यांची २४ वी बदली असून, विविध विभागात सातत्यपूर्ण कार्यकुशलतेमुळे ते महाराष्ट्र प्रशासनातील एक महत्त्वाचा आणि चर्चित अधिकारी बनले आहेत.

प्रशासनातील मोठा फेरबदल
या फेरीमध्ये इतर वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनाही महत्त्वाच्या पदांवर नेले गेले आहे. लोकेश चंद्रा (आयएएस: आरआर:१९९३) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, आता मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत.

अश्विनी भिडे (आयएएस:आरआर:१९९५), मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव, आता महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत राहणार आहेत.

कृषी व वित्त विभागात बदल
विकास चंद्र रस्तोगी (आयएएस:आरआर:१९९५), जे आधी कृषी व एडीएफ विभागात अतिरिक्त मुख्य सचिव होते, ते आता वित्त विभागात आर्थिक सुधारणांसाठी अतिरिक्त मुख्य सचिव झाले आहेत. परिमल सिंग (आयएएस:आरआर:२००४), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, आता कृषी विभागाचे सचिव झाले आहेत.


विनिता वैद सिंगल (आयएएस:आरआर:१९९६), जे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव होते, त्यांनी माती व जलसंवर्धन विभागाचे प्रमुख सचिवपद सांभाळणार आहेत. लहु माळी (आयएएस:एससीएस:२००९) शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक झाले आहेत. मनीक गुरसाळ (आयएएस: एससीएस: २००९) आता अपंग कल्याण विभागाचे सचिव म्हणून तुकाराम मुंडेंची जागा घेत आहेत.

महापालिका व मत्स्य विभागातील बदल
प्रेरणा देशभ्रतार (आयएएस:आरआर:२०१०), राज्य कर विभागातील संयुक्त आयुक्त, आता मत्स्य विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत राहणार आहेत. पृथ्वीराज बी पी (आयएएस:आरआर:२०१४), पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, आता वसई विरार महानगरपालिका आयुक्त झाले आहेत. या फेरबदलांमुळे राज्य प्रशासनातील धोरणात्मक आणि कार्यात्मक भूमिका अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाचे सूत्र सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!