Friday, March 20, 2026
Home क्राईम न्यूज धक्कादायक बातमी – सासरवाडीच्या छळास कंटाळून चारपाणी चिठ्ठी लिहून पतीने संपवली जीवनयात्रा

धक्कादायक बातमी – सासरवाडीच्या छळास कंटाळून चारपाणी चिठ्ठी लिहून पतीने संपवली जीवनयात्रा

0
253

जामखेड न्युज——

धक्कादायक बातमी – सासरवाडीच्या छळास कंटाळून चारपाणी चिठ्ठी लिहून पतीने संपवली जीवनयात्रा

 

लग्न होऊन देखील पत्नीचा नाद सोडून दे, नाहीतर तुझा मर्डर करु अशा सासरवाडी कडील लोकांकडुन वारंवार धमक्या देऊन पत्नीस नांदवायला पाठवत नव्हते. पत्नीने देखील सासरी यायला नकार दिला. आखेर याच त्रासाला कंटाळून पतीने मोबाईलवर आत्महत्याचे टेट्स ठेऊन सासरकडील लोकांच्या विरोधात आत्महत्या करत आसल्याची चार पानी चिठ्ठी लिहुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील नायगाव या ठीकाणी घडली आहे.

या प्रकरणी मुलाचे चुलते पोपट रामभाऊ जाधव वय ४२ वर्षे, रा. नायगाव ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरवाडी कडील आरोपी सविता कैलास जाधव, कैलास जाधव, विलास कैलास जाधव, बालाजी कैलास जाधव, लताबाई कैलास जाधव व कविता गणेश किलमिस (कविता कैलास जाधव) सर्व रा. दौंडाचीवाडी ता. जामखेड अशा सहा जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला आत्महतेस प्रवृत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी की फीर्यादीचा मयत पुतण्या हरिश्चंद्र राजेंद्र जाधव व त्याची पत्नी सविता कैलास जाधव यांचे लग्नापूर्वी चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्या दोघांचे लग्न करण्याचे ठरले होते. मात्र लग्नापूर्वीच हरिश्चंद्र व कविता यांना एक मुलगा झाला. हे सासरवाडीच्या सर्व लोकांना माहीत होते. त्यामुळे त्या दोघांचे पुन्हा लग्न करण्याचे ठरले. मात्र बराच काळ उलटूनही व लग्नाआधीच दोघांना मुलगा होऊनही मुलीचे वडील कैलास जाधव यांनी त्या दोघांचे लग्न लावुन देण्यास टाळाटाळ केली.

 

त्यामुळे या दोघांनी आळंदी या ठिकाणी जाऊन विवाह केला. हीच गोष्ट सासरवाडी कडील मुलीच्या नातेवाईकांना खटकली त्यामुळे मयत मुलगा हरिश्चंद्र यास मुलीच्या सासरवाडीच्या लोकांनी त्याचे लग्न होऊन देखील तु तुझ्या पत्नीचा नाद सोड, नाहीतर तुझा मर्डर करु, अशा वारंवार धमक्या देत होते. पत्नीला देखील नांदायला पाठवत नव्हते व पत्नीने देखील सासरी येण्यास नकार दिला होता.

यानंतर फिर्यादीच्या ओळखीच्या मित्राने दि २९ रोजी फिर्यादीस सांगितले की तुमचा पुतण्या हरिश्चंद्र जाधव याने वरील सहा आरोपींची नावे व लहान बाळाचा फोटो व हॉस्पिटल चे कागदपत्रे त्याच्या
मोबाईलवरील टेट्सला ठेवले आहेत. यानंतर दि २९ जुलै २०२३ रोजी दुपारी साडेतीन वाजता नायगाव येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन हरिश्चंद्र याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत मी सासरवाडीच्या लोकांना कंटाळून आत्महत्या करत आसल्याची चारापानी सुसाईड नोट मोबाईल फोनच्या कव्हर मध्ये ठेवलेली पोलिसांना आढळून आली. या धक्कादायक घटने प्रकरणी सासरवाडीच्या एकुण सहा जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला आत्महत्यास प्रवृत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करित आहेत.

काय लिहले आहे सुसाईड नोट मध्ये वाचा सविस्तर …..

मी हरिश्चंद्र जाधव आज आत्महत्या करणार आहे. त्याला जबाबदार सविता कैलास जाधव, तिचे वडील कैलास जाधव, आई लताबाई जाधव, तिचे भाऊ विलास जाधव, बालाजी जाधव आणि त्या मुलीची बहीण कविता गणेश किलमिसे (कविता कैलास जाधव ) हे जबाबदार आहेत. मी आणि माझी पत्नी सविता चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होतो ,दोन वर्षांपूर्वी ती मुलगी प्रेग्नंट राहीली होती .त्याची पहील्यांदा माहीती मुलीला आणि तीच्या वडीलांना डॉक्टरांनी सांगितली होती. नंतर त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी मला ब्लॉक मेल करुन व दम देऊन मुलीची डीलेव्हरी करायला लावली मी त्यांच्या दबावामुळे ते म्हणतील तसे वागत होतो. डीलेव्हरी झाल्यावर मी बाळाला माझ्या घरी घेऊन जाणार होते पण मला बाळाला नेहुन दिले नाही. ते बाळाला घेऊन गेले व त्यांनी माझ्या सहा महीन्याच्या बाळाला मारलं या बाबत मी त्यांना विचारले असता मला ब्लॅक मेल करुन वेगवेगळ्या माणसांकडून धमकी देतात .या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे .या बाबत माझ्या घरच्यांचा काही दोष नाही मी त्यांना या गोष्टी बद्दल काही सांगीतले नाही .माझी आत्महत्या करण्याची इच्छा नाही पण त्या सहा जणांकडून होणारा त्रास मला सहन होत नाही .माझ्या फक्त दोनच इच्छा आहेत एक बाळाला मारले आणि मला त्रास देऊन आत्महत्या करायला लावली म्हणून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. दुसरे असे की त्यांनी माझ्या कडून घेतलेले दोन लाख रुपये माझ्या घरी आईला द्यावेत. आसा चिठ्ठी मध्ये मजकुर लिहुन त्याखाली हरि जाधव मराठीत लिहुन इंग्रजी मध्ये सही केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!