जामखेड न्युज——
जामखेड शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
शहरात सालाबादाप्रमाणे साठे नगर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पोलीस निरीक्षक मा.महेश पाटील साहेब व मुख्यधिकारी अजय साळवे साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर अभिवादन सभा घेण्यात आली.
सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अँड अरुण जाधव, सावळेश्वर उद्योग समुहाचे उद्योजक रमेश आजबे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने,प्रा.लक्ष्मण ढेपे,नगरसेवक अमित चिंतामणी,भाजपाचे युवा नेते जमीर बारुद,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे,भारतीय बौद्ध महासभेचे महिला तालुकाध्यक्ष सुरेखा सदाफुले इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,मार्केट कमीटीचे सभापती शरद कार्ले,प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात,भिमटोला ग्रुपचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड,नगराध्यक्ष निखिल घायतडक,माजी संचालक सागर सदाफुले, वैजीनाथ पोले,नगरसेवक अर्शद शेख,नगरसेवक अमित जाधव,डाॅ.प्रदीप कात्रजकर,शिवप्रतिष्ठानचे पांडुराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमरभाई कुरेशी,वसीम सय्यद,प्रा.राहुल आहेर,मनसेचे सनी सदाफुले, अमोल गिरमे,नितीन हुलगुंडे, लखन मिसाळ,रवी सोनवणे,विजयकुमार जाधव,सुरज डाडर,सिंध्दात डाडर,सचिन सदाफुले,अमर जाधव,आकाश साठे,दादा मोरे,करण घायतडक,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन साठे नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर काबंळे यांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वीसाठी साठे जयंती उत्सव समीतीचे अध्यक्ष संतोष थोरात,उपाध्यक्ष शरद मोरे, खजिनदार जितेश डाडर,अतिश डाडर,नितीन डाडर,रवी डाडर,बाळु डाडर,दादा डाडर,शेखर मोरे,सागर काबंळे,लखन मोरे,दादा अडागळे,मनोज डाडर,लखन गाडे,मनीष घायतडक, मिलिंद भोसले,कुमार गाडे,सोनू क्षीरसागर,प्रेम काबंळे,प्रशांत काळे,आदींनी परिश्रम घेतले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी केले तर आभार किशोर काबंळे यांनी मानले.