जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पीके जळुन चालली आहेत. संतप्त झालेल्या खुरदैठण येथील लक्ष्मण भिकाजी कदम या शेतकऱ्यांने चक्क शेतातील विद्युतरोहीत्रावर चढुन रोहीत्राच्या तारा हतात घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या मधिल वीजपुरवठा खंडित आसल्याने मोठा अनर्थ टळला. या नंतर सरपंच, ग्रामसेवक व गावकर्यांनी समजुत घातली व त्या शेतकऱ्यास खाली उतरविण्यात आले.
ADVERTISEMENT

अतिवृष्टी, दुष्काळ आणि गेली दोन वर्षे कोरोनामध्ये गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लगला आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अचडणीचा सामना करावा लागत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने सर्व पिके चांगली आली आहेत. यातून आर्थिक घडी बसण्याची शेतकऱ्यांना आशा होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये महावितरणने जामखेड तालुक्यात वीज तोडणीची मोहीम वेगाने सुरू केल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले असून पाणी असूनही अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देत येत नाही. एका बाजूला महावितरण वीज तोडणीवर ठाम आहे, तर दुसरीकडे शेतकरीही याविरुद्ध आक्रमक होताना या घटनेवरून दिसुन येत आहेत.
महावितरण विभागाने जामखेड तालुक्यात वीजकनेक्शन तोडणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे खुरदैठन परीसरातील देखील शेतकर्यांचे वीज बील थकल्यामुळे विद्युतरोहीत्र बंद केली आहेत. खुरदैठन येथील लक्ष्मण भिकाजी कदम यांनी आपल्या शेतात ऊस लावला आहे. तो पाणीटंचाई मुळे जळु लागला होता. त्यातच शेतकरी लक्ष्मण कदम यांच्या शेता जवळील कदम वस्ती येथील विद्युतरोहीत्र विजबील थकल्यामुळे दोन दिवसांपूर्वी बंद करून विजकनेक्शन कट केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी येथील विद्युतरोहीत्रावर चढुन चक्क विद्युतरोहीत्राच्या तारा हतात घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने डी पी वरील वीजपुरवठा खंडित आसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या नंतर खुरदैठन चे सरपंच ओंकार डुचे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ठाकरे, शहाजी डुचे, ग्रामसेवक इम्रान शेख, ऋषिकेश डुचे अब्बास सय्यद सह गावकर्यांनी आंदोलनकर्ते कदम यांची समजुत घालुन शेतकऱ्यास खाली उतरवण्यात आले. त्या मुळे पुढील अनर्थ टळला.
चौकट
महावितरण कंपनीने व शासनाकडून सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ चालु बीले भरणे बंधनकारक आहे. शासनाने सवलत देऊनही थकबाकी वसूल होत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार विज कलेक्शन तोडण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करावे असे मत जामखेड महावितरणचे उपअभियंता योगेश कासलीवाल यांनी व्यक्त केले.
चौकट
सगळीकडे कडक उन्हाळा सुरू झाला असून शेतकऱ्यांची पिके व फळबागा पाण्याला आलेल्या आहेत, अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने खुरदैठन परीसरातील वीजकनेक्शन तोडले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खुप आंदोलने केली मात्र सरकार ला जाग येत नाही त्यामुळे आता हतात काठ्या व कुऱ्हाडी घेण्याची वेळ आली आहे.
(ऋषिकेश डुचे, स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी अध्यक्ष)
चौकट
वीज कनेक्शन तोडल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहावयास मिळत असल्याने आजच राज्य सरकारने तीन महिने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये अशा सूचना दिल्या आहेत.