जामखेड न्युज – – – –
नुकत्याच पार पडलेल्या कोल्हेवाडी सेवा संस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय झाला पण भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांनी कोल्हेवाडी सोसायटी आमच्या ताब्यात असा दावा केला आहे. आज साकतमध्ये नवनिर्वाचित सर्व १३ सदस्यांचा सत्कार डॉ. भगवानराव मुरुमकर यांनी आयोजित केला होता यावेळी संचालक साहेबराव कडभने यांनी सांगितले की, आमचा पॅनल भाजपाचा आहे आमदार रोहित पवारांशी आमचा काहिही संबंध नाही.
निवडणूकीच्या दिवशी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर मुरुमकर यांनी सर्व सदस्यांचा सत्कार केला व सेवा संस्था भाजपाच्या ताब्यात म्हटले होते काल जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी जिल्हा बँकेत सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला व कोल्हेवाडी सोसायटी सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात, आमदार रोहित पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात म्हणून प्रेस नोट दिली होती.
ADVERTISEMENT

आज पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांनी साकत येथे कोल्हेवाडी सेवा संस्थेच्या सर्व सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी नुतन संचालक व माजी व्हाईस चेअरमन
साहेबराव कडभने यांनी सांगितले की, आमचा आमदार रोहित पवारांशी काहीही संबंध नाही आमचे नेते सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात, सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व सुधीर राळेभात हे आमचे नेते आहेत. आमचा आमदार रोहित पवार व सरपंच यांच्याशी काहीही संबंध नाही आम्हाला निवडणूक काळात आमदारांच्या माध्यमातून खुप त्रास दिला तरीही मतदार आमच्या बरोबर राहिले आमचा सहकार पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी झाला आमचा रोहीत पवाराशी व राष्ट्रवादीचा काडीचा सबंद नाही, आम्ही भाजपा म्हणुन लढलो, व भाजपाचेच आहोत असे सांगितले.