जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत जामखेड मतदारसंघात विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. अशातच रोहित पवार यांच्या आमदार निधीतून अरणगाव व जवळा वीज उपकेंद्राअंतर्गत एकूण 6 विद्युत वाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
ADVERTISEMENT 

यामध्ये अरणगाव, पाटोदा, हळगाव, चोंडी, पिंपरखेड व नान्नज या गावांचा समावेश आहे. यापैकी आतापर्यंत एकूण 6 पैकी 4 फिडरचे काम पूर्ण झाले असून बुधवारी अरणगाव, पाटोदा, हळगाव या 3 फिडरचा लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच चोंडी येथील कामही यापूर्वीच पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले होते. सध्या या 3 ठिकाणचे काम पूर्ण होऊन लोकार्पण झाल्यामुळे अरणगाव सबटेशन अंतर्गत येणाऱ्या पारेवाडी, डोनगाव अरणगाव, पाटोदा, भवरवाडी तसेच जवळा सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या हळगाव, मतेवाडी, आघी या गावातील विजेचा लपंडाव कायमचा दूर होऊन अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी फायदा होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला दत्ता वारे, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे,
सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश अजबे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आमदार रोहित पवार सतत प्रयत्नशील असतात. त्यातच जवळा व अरणगाव वीज उपकेंद्रअंतर्गत होणाऱ्या नवीन विद्युत वाहिनीच्या कामामुळे 5 हजार 400 पेक्षा जास्त शेतीपंप तसेच 720 रोहित्र या माध्यमातून जोडले जाणार आहेत. पिंपरखेड व नान्नज येथे सुरू असलेले शेवटच्या टप्प्यातील विद्युत वाहिनीचे कामही येत्या काळात लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. सध्या जामखेड तालुक्यात एकूण सव्वा कोटी रुपयांचे विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारी विजेची अडचण कायमची दूर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.