बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहारचे चौंडीत आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे करून सरकारचा निषेध
महाराष्ट्रात दररोज दहा ते पंधरा शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत तर आज पर्यंत सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मात्र तरी देखील सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. चौंडी येथील हा रक्षाबंधन म्हणजे ही बांधलेली राखी नसुन हा वेदनांचा धागा आहे. असे सांगत प्रहर जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चुभाऊ कडू यांनी सरकारचा निषेध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे मुखवटे घातलेल्या प्रतिकात्मक नेत्यांना विधवा व निराधार महीलांनी काळी राखी बांधून निषेध करण्यात आला.
निवडणूक प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते आणि आता वेगवेगळे कारण सांगत आहेत. तेव्हा काय गांजा पिऊन कर्जमाफी ची घोषणा केली होती काय असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
कमी हमीभाव, नैसर्गिक आपत्ती यामुळे कर्जबाजारी होऊन महाराष्ट्रात 6 लाख शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या आहेत. याच घटनेच्या निषेधार्थ शनिवार दि 9 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव असलेल्या चौंडी येथे रक्षा बंधनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे मुखवटे घातलेल्यांना विधवा व निराधार महिलांनी काळी राखी बांधून सरकारचा निषेध करण्यात आला.
पुढे बोलताना बच्चूभाऊ कडू म्हणाले की राज्यात दुष्काळापेक्षा जास्त चटके शेतीमालाला भाव नाही म्हणून बसत आहेत. आहील्यादेवी होळकर यांनी जे राज्य चालवले ते राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चालवता येते का? हे विचारण्यासाठी आम्ही अहिल्यादेवी यांच्या चौंडी येथे आलो आहोत. अहिल्यादेवींचे विचार माझ्या सरकारच्या डोक्यात गेले पाहिजेत यासाठी आम्ही आहील्यादेवी यांच्या समाधीस्थळी आलो आहोत.
शक्तीपीठ महामार्गाला हे सरकार 80 हजार कोटी न मागता हे देत आहे. लाडक्या बहिणींना पैसै द्यायचे आणि लाडक्या भावाच्या शेतीमालाला भाव द्यायचा नाही बहीणींच्या हातात पैसै द्यायचे आणि भावाला लुटायचे काम हे सरकार करत आहे. अपंगांच्या पगाराचे पैसै चार चार महीने द्यायचे नाही मात्र आमदार खासदार यांचे पगार थांबत नाहीत असा टोला देखील बच्चू कडू यांनी लावला आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, तालुका अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार कर्जत तालुका प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष सुदाम निकत, शेवगाव जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, महिला आघाडीचे अध्यक्ष अनारसे ताई, जामखेड शहराध्यक्ष दिनेश राळेभात, दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पोकळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख, सचिन उगले, दिव्यांग सेल अध्यक्ष प्रमोद खोटे, युवक अध्यक्ष, राहुल भालेराव, जवळा गट प्रमुख, महीला तालुका अध्यक्ष संगीता ढोले, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंगटे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, राष्ट्रीय समाज पक्ष तालुकाध्यक्ष डॉ. कारंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवकाचे उपाध्यक्ष विकास मासाळ, खर्डा गट प्रमुख बंडू उगले, शहर उपाध्यक्ष बबन घायतडक, शहर संघटक विकास राळेभात, सतिश राळेभात संजय मोरे शिवाजी भोसले व सोहेल तांबोळी सह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.