एक राखी सैनिकांसाठी या अभियानांतर्गतन्यू इंग्लिश स्कूल राजुरी विद्यालयामध्ये रक्षाबंधनसाजरे
सीमेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाला आपल्या गावी जाऊन रक्षाबंधन या पवित्र सणाला उपस्थित राहता येत नाही म्हणून विद्यालयातील विद्यार्थिनींनी पोस्टमन श्रीमती योगिनी देवडे मॅडम यांच्या सहकार्याने व विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड सह सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सैनिकांसाठी राख्या पाठवण्याचे नियोजन करण्यात आले होते.
रक्षाबंधन हा हिंदूचा एक लोकप्रिय सण आहे. दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटा भोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर बांधतात. ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेट वस्तू देतो.
रक्षाबंधन हा सण हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो जो सामान्यतः ऑगस्ट महिन्यामध्ये येतो. रक्षाबंधन याचा शब्दशः संस्कृत अर्थ संरक्षण बंधन किंवा काळजी असा होतो. बहिण भावाचा हा सण ज्याचा उगम लोकसंस्कृती मध्ये झाला.त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होती काही ठिकाणी सलून सिलोनो आणि राकरी असे संबोधले जात होते.
सैनिक तर सीमेवर उभे राहून आपल्या बहिणी बरोबर सर्वांचेच संरक्षण करतात त्यांच्या प्रति आदर प्रेम करुणा आभार व्यक्त करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न. रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देऊन सैनिक आपल्या सीमेचे देशाचे संरक्षण करतात खरोखरच त्यांच्या कार्याला सलाम. सैनिकांसाठी देशभरातून अनेक भगिनींकडून लाखो राख्या सीमेवर पोहोच होत आहेत.
मिळालेल्या राख्या पाहून सैनिकांचाही उर भरून येत असेल असा हा अनोखा रक्षाबंधन सण आज देशभरामध्ये साजरा केला जात आहे. खरोखरच पोस्ट विभागातील सर्वच अधिकारी यांचे आभार की सैनिकांसाठी राखी-प्रेम, सन्मान आभार या उपक्रमांतर्गत राख्या पाठवण्यासाठी विद्यार्थिनींना सहकार्य केले.
यावेळी मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, राजेंद्र पवार, श्रीमती सुनिता पिसाळ, सुभाष बोराटे, सय्यद जुबेर, विजय क्षीरसागर,अक्षय मोहिते, शशिकांत सदाफुले,अनिकेत चौभारे, उमराव लटपटे, हनुमान राऊत शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते