एसटी कर्मचाऱ्यांचा संयम संपला – आता अर्धनग्न परवापासून अन्नत्याग आंदोलन करणार

0
229
जामखेड न्युज – – – – 
एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण होण्यासाठी आपला लढा अधिक तीव्र केला आहे. बीड आगारात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला १२२ दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नाही, असं स्पष्ट केलं आहे.
यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत आता माघार नाही, असं म्हणत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करून मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.
या सगळ्या राज्य शासनाने आणि या समितीने आमच्या मागण्याकडे तसे कसल्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने एसटी कर्मचाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे आणि हाच निर्णय पूर्णपणे घोळवा घोळविचा असल्याचं पाहायला मिळते. मात्र, आता आम्ही येत्या सात तारखेला अन्नत्याग उपोषण करणार आहोत आता यानंतर जे होईल त्याला जबाबदार राज्यशासन राहील असे एसटी कर्मचारी म्हणाले आहेत.
मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपला आता १२२ दिवस पूर्ण झाले आहेत आणि या संपामध्ये दरवेळेस वेगळ्या प्रकारे त्यांनी आंदोलन छेडलं होतं. मात्र, आता जिवाशी खेळणारा आंदोलन येत्या ७ तारखेमध्ये ते सुरू करणार आहेत. अन्नत्याग आंदोलन करत शासनाचा निषेध करत हे आंदोलन सात तारखेपासून सुरुवात होणार असल्याचेही या वेळेस निश्चित कर्मचाऱ्यांनी सांगितला आहे.
आता एसटी कर्मचाऱ्यांच्या या मोठ्या निर्णयावर राज्य शासन तू केलं का? त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का? आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का? हे पाहणे गरजेचे आहे. मात्र, आजच्या अर्धनग्न आंदोलनाने जवळ-जवळ महाराष्ट्राचं लक्ष घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here