Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या अतिक्रमणामुळे जामखेड शहराचे विद्रुपीकरण, अतिक्रमणीत टपऱ्या भाड्याने

अतिक्रमणामुळे जामखेड शहराचे विद्रुपीकरण, अतिक्रमणीत टपऱ्या भाड्याने

0
2

जामखेड न्युज——

अतिक्रमणामुळे जामखेड शहराचे विद्रुपीकरण, अतिक्रमणीत टपऱ्या भाड्याने

जिल्ह्यातील व परिसरातील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली फक्त जामखेड शहरातील लहान मोठे अतिक्रमणे काढली पण मोठ मोठे अतिक्रमणे तसीच आहेत. याबाबत अवधुत पवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ने उपोषण आंदोलन केले होते. शहरातील अतिक्रमणे न हटवता राष्ट्रीय महामार्ग रस्ता सुरू करण्यात आला तसेच गटारावर टपऱ्या बांधून भाड्याने दिलेल्या आहेत. शहरातील पाईपलाईन कोठून जाणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आता नगरपरिषद जामखेड यांनी अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या आहेत.

नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात अतिक्रमण काढून घ्याव्येत अन्यथा अतिक्रमण हटविण्याचा खर्च संबधित अतिक्रमण धारकांना करावा लागेल
राष्ट्रीय महामार्ग गटारावर काहींनी पक्के तर काहिंनी तात्पुरते बांधकाम करत दहा हजार रुपये महिन्याने टपऱ्या भाड्याने दिल्या आहेत. बस स्थानकापासून ते बीड रोड पर्यंत अनेक अतिक्रमणे आहेत. विशेष म्हणजे शहरातील स्वतः ला प्रतिष्ठित समजणाऱ्या अनेक लोकांचेच अतिक्रमणे आहेत. आता नोटीसा मिळाल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत. आगोरही नोटीसा अनेक वेळा देण्यात आल्या होत्या पण काही निघाले तर काही तसेच राहिले बीड रोडवर तर मोठ मोठ्या इमारती आहेत त्यामुळे आता अतिक्रमणे निघणार का हे पाहणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय महामार्गच नव्हे तर खर्डा रोड, भुतवडा रोड सह अनेक रोडवर मोठ मोठ्या लोकांचे अतिक्रमणे आहेत. यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण होते. तसेच यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. अनेकांनी तर ग्रामपंचायत असताना अतिक्रमणीत जागेची अधिकृत नोंदणी केलेली आहे. यामुळे रस्ते लहान झालेले आहेत.

जामखेड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी वरील जामखेड ते सौताडा या रस्त्याच्या हद्दीत तथा रस्त्या लगत नगरपरिषद कार्यालयाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता नियमबाह्य बांधकाम / अतिक्रमण केलेले आहेत. काही ठिकाणी टपऱ्या तर काही ठिकाणी मोठ मोठ्या इमारती उभ्या आहेत.

जामखेड ते सौताडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी हा रस्ता जामखेड शहराच्या हद्दीतून जात असून हा रस्ता शहराच्या विकास योजना रस्ते मध्ये समाविष्ट आहे. तसेच नगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेचे काम चालू होणार आहे.

जामखेड ते सौताडा रस्ता राष्ट्रीय महामार्गलगत दोन्ही बाजूच्या स्टॉर्म वॉटर लाईन (नाली) पासून ३ मिटरच्या म्हणजेच दहा फुट अंतर्गत येणारे सर्व बांधकाम अनधिकृत असून कार्यालयाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता नियमबाह्य बांधकाम/ अतिक्रमण केलेले आहे.

तरी सदरचे अनाधिकृत/नियमबाह्य बांधकाम ही नोटीस मिळाल्यापासून सात (७) दिवसाच्या आत काढून घ्यावे व संबंधित कार्यन्वयन यंत्रणेला यथोचित सहकार्य करावे.

अन्यथा सदर रस्ता विकसित करण्याऱ्या संबंधित यंत्रणेमार्फत सदरचे बांधकाम काढण्यात येईल आणि त्याचा खर्च आपणा कडून वसूल केला जाईल व आपल्या होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे नोटीसीत म्हटले आहे. यामुळे अतिक्रमणे नियमानुसार निघाले तर वाहतूक कोंडी ची समस्या दूर होईल व सुसज्ज शहर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!