जामखेड न्युज – – – –
अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक व विखे पाटील यांचे कट्टर समर्थक अमोल राळेभात आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत त्यामुळे भाजपाला व विखे गटाला मोठा धक्का समजला जात आहे.
अमोल राळेभात सह त्यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार व कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहिर प्रवेश केला आहे त्यामुळे जामखेड तालुक्यात आमदार रोहित दादांनी पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. आणखी काही भाजपाचे बडे मासे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागणार आहेत अशी चर्चा जामखेडच्या राजकीय राजकारणामधे आहे.