जामखेड सकल मराठा समाज व शिवप्रेमींच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन व प्रतिमा दहन

0
276

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – – – 
    औरंगाबादमधील एका कार्यक्रमातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या एका वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. ‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांचं स्थान काय?’ असं विधान कोश्यारी यांनी केले होते. समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू असल्याचे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावर आता राज्यभरातून तीव्र पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. जामखेड तालुक्यातील सकल मराठा समाज व शिवप्रेमींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन व प्रतिमा दहन केले.
   सकल मराठा समाजाचे तालुका समन्वयक मंगेश ( दादा) आजबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, मंगेश मुळे, राहुल पवार, किशोर गायवळ, सुरज कदम, तुषार काढणे, कृष्णा डुचे, बंडू मुळे, अनिल सरोदे, दादाराजे भोसले, ऋषी भोसले, प्रशांत शिंदे, दत्ता वारे, संजय ढोले, कैलास वराट, यांच्या सह सकल मराठा समाजाचे बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी सकल मराठा समाज व शिवप्रेमींच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या. जामखेड न्युजशी बोलताना शिवप्रेमींनी सांगितले की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे अन्यथा संपुर्ण महाराष्ट्र भर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा व शिवप्रेमींनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here