Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या मराठा आरक्षणासाठी व छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या...

मराठा आरक्षणासाठी व छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

0
293
जामखेड प्रतिनिधी
              जामखेड न्युज – – – 
  खासदार छत्रपती संभाजी राजे हे मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदान, येथे आमरण उपोषणासाठी बसले होते त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून जामखेड तालुका सकल मराठा समाज  यांच्या वतीने जामखेड येथे आज दिवसभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शविला होता सायंकाळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले व उपोषण मागे घेण्यात आले.
      सकल मराठा समाजाचे तालुका समन्वयक मंगेश  (दादा) आजबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले,
मंगेश मुळे, राहुल पवार, किशोर गायवळ, सुरज कदम, तुषार काढणे, कृष्णा डुचे, बंडू मुळे, अनिल सरोदे, दादाराजे भोसले, ऋषी भोसले, प्रशांत शिंदे, दत्ता वारे, संजय ढोले, कैलास वराट, यांच्या सह सकल मराठा समाजाचे बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.
      दिवसभर विविध पक्षांच्या नेत्यांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दर्शविला यावेळी जामखेड न्युजशी बोलताना सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश (दादा) आजबे म्हणाले की समाजातील बहुतांश समाज हा गरीब आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळणे आवश्यक आहे. आरक्षण जाहीर न केल्यास परत मराठा समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत असा इशारा दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!