जामखेड न्युज – – – –
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जैन कॉन्फरन्स दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जैन संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी यांनी दिली
संजय कोठारी यांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत असून, दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता भूम तालुक्यातील नळीवडगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रम ( जिल्हा उस्मानाबाद) येथील वृद्धांना मिष्ठान्न भोजन देण्यात येणार आहे. तर जामखेड येथील नवज्योत प्रकल्पातील अनाथ मुलांना आणि वृद्धांना मिठाई वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोकाट जनावरांना चारा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कोठारी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतिलाल कोठारी यानी दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन संजय कोठारी मित्रमंडळाचे प्रफुल्ल सोळंकी ,योगेश पवार ,गणेश देवकाते, रोहिदास केकान, अनिल फिरोदिया, अमोल लोहकरे, अरुण लटके, मनोज कुलथे यांनी केले आहे.