जामखेड न्युज – – – – –
शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या
निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार काल रविवारी कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांच्या उपस्थितीत खर्डा व नान्नज येथे शिवसेना पदाधिकाऱ्याची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला व मार्गदर्शन केले.
यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे, पाथर्डीचे ज्येष्ठ शिवसैनिक विष्णुपंत पवार, शिवसेना जामखेड तालुका प्रमुख संजय (काका) काशिद, तालुका उपप्रमुख गणेश उगले, शहरप्रमुख गणेश काळे, युवासेना शहरप्रमुख सूरज काळे, विभाग प्रमुख संतोष शिंदे, गणप्रमुख राहुल दाताळ, जैष्ठ शिवसैनिक अरविंद ठाकरे, आकाश कोरे, सागर सुरवसे, अवि सुरवसे, जैष्ठ शिवसैनिक अरविंद ठाकरे, आकाश कोरे,सागर सुरवसे, अवि सुरवसे, महेंद्र काळे, आण्णा दाताळ सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
जामखेड तालुक्यात आगोदर दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गण होते आता नविन पुनर्रचनेत एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढले आहेत खर्डा, जवळा व साकत जिल्हा परिषद खर्डा गट
तर खर्डा व नान्नज गण, जवळा गटात जवळा व अरणगाव गण, साकत गटात साकत व शिऊर गण असे गट गण झाले आहेत त्यानुसार काल रविवारी शिवसेना कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांनी खर्डा गट गण व नान्नज गणाचा आढावा घेतला यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.