जामखेड न्युज – – – –
जामखेड येथील मल्लविद्या संस्कार कुस्ती फांउडेशनच्या माध्यमातून दि . ६ मार्च रोजी जामखेड येथे राज्यस्तरीय भव्य हॉफ मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी पै. बबन काशिद यांनी दिली.
दि. ६ मार्च रोजी जामखेड शहरात राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन पुरूष व महिला स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. पुरूषांसाठी २१ किलोमीटर, महिलांसाठी १० किलोमीटर तर कुमार गटासाठी ५ किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे . या स्पर्धेत खुला गटामध्ये पुरूषांसाठी प्रथम २१ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय ११ हजार, चतुर्थ ७ हजार, पाचवे ५ हजार रुपये, तर महिलांसाठी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचा पुढाकार पाच पारितोषके ठेवण्यात आली आहे. यामध्ये प्रथम ११ हजार , द्वितीय ७ हजार , तृतीय ५ हजार , चतुर्थ ३ हजार , पाचवे २ हजार रुपये आहेत तर कुमार गटासाठी मुले व मुलींसाठी अनुक्रमे प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार , तृतीय २ हजार याबरोबरच विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक , ट्राफी व मेडल असे बक्षिसे दिली जाणार आहेत.
दि. ६ मार्च रोजी रोजी सकाळी ६: ३० वाजता जामखेड शहरातील खर्डा चौक येथून या स्पर्धेला सुरू होणार असून आ. रोहित पवार, माजीमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, मराठा गौरव युवराज काशीद यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी राज्यातील स्पर्धकांनी या राज्यस्तरीय भव्य हॉफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक पै. बबन (काका) काशिद यांनी केले आहे.