जामखेड न्युज – – – –
बीडमध्ये (beed) काही दिवसांपूर्वी परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर संस्थानकडे धमकीचा फोन आला होता. आता पुन्हा एकदा श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थांचे महंत महादेव भारती महाराज (baleshore sansthan mandir) व लिंबागणेश येथील डॉ. सचिन जायभाये यांना कॉल करून अज्ञात व्यक्तीने 45 लाखाची मागणी केली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे, या फोन कॉलमुळे (Threatening phone call) एकच खळबळ उडाली आहे.
बेलेश्वर संस्थान हे हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्री उत्सव सुरू असून त्यामुळे भाविक भक्तांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष दोघांनाही एकाच मोबाईल नंबर वरून धमकी आल्याचं पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आज बेलेश्वर संस्थांनचे भारती महाराज यांना अनोळखी मोबाईल क्रमांकाद्वारे ‘तुमचा जीव वाचवायचा असेल तर चार लाख द्या’ अशी मागणी करण्यात आली. यानंतर काही वेळाने याच मोबाईल क्रमांकाद्वारे लिंबागणेश येथील डॉक्टर सचिन जायभाये यांना ‘तुमची सुपारी 45 लाखाची असून जीव वाचवायचा असेल तर पैसे द्या’ अशी मागणी करण्यात आली. या दोघांनी नेकनुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून दोघांनाही एकाच नंबर वरून कॉल आले असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात बेलेश्वर संस्थान आहे. या संस्थानावरील महादेव भारती महाराज व लिंबागणेश येथील डॉ.सचिन जायभाये या दोघांना एकाच नंबरवरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. पहिलांदा भारती महाराज यांना फोन करून चार लाख रुपये द्या, अन्यथा आम्हाला तुमच्या खुनाची सुपारी मिळाली असल्याचे खंडणीखोर म्हणाला. त्यानंतर थोड्याच वेळात डॉ. सचिन जायभाये यांना त्याच व्यक्तीने फोन करून 45 लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास तुमच्या हत्येची सुपारी मिळाली असल्याचे त्याने म्हटलं. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही कॉल रेकॉर्ड ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.