जामखेड न्युज – – – – –
लिंगायत कोष्टी समाजाला अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नाही जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लिंगायत गोष्टी समाज्याकडून प्रशासनाला वारंवार मागणी जागा मिळत नसल्याने वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याची घटना रविवार दिनांक 27/02/2022 रोजी जामखेड शहरात घडली आहे. जामखेड शहरांमध्ये लिंगायत कोष्टी समाजाला स्मशानभूमी नाही. त्यामुळे गावातील नागरिकाना दफनभूमी साठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र, अद्यापही स्मशानभूमीचा प्रश्न संपुष्टात आला नाही. येथील गावातील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करायचे कोठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
जामखेड शहरातील तपनेश्वर महादेव मंदिर भागातील कै. प्रशांत काशिनाथ सस्तारे सर यांचे दु:ख निधन झाले. त्यामुळे नातेवाईक आणि नागरिकांनी रविवारी अंत्यविधीची तयारी सुरु केली. परंतु, अंत्यसंस्कार कोठे करावे, असा प्रश्न निर्माण झाला. सस्तारे सर यांच्यावर अंत्यसंस्कार कोठे करायचे, असा सवाल करीत नागरिकांनी दुरध्वनी द्वारे तहसीलदार योगेश चंद्रे व नगरपरिषदचे मुख्य अधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्याकडे अरणगावचे सरपंच लहू शिंदे यांनी केली. तेव्हा वीरशैवलिंगायत समाजच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी निर्णय घेतला होता. मात्र, वीरशैव लिंगायत समाजाला स्मशानभूमीची जागा कमी असुन त्याची अनेक दिवसांपासून जागेसाठी मागणी करीत असुन वीरशैवलिंगायत समाजाचे अध्यक्ष बजरंग सरडे यांनी सर्व समाज बांधवांना व पूर्ण कॉल कॉन्फरन्स वर बोलणी करून समाजाची परवानगी घेऊन परवानगी दिली तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी जागा उपलब्ध करून देऊ असे सांगितले त्यानंतर वीरशैवलिंगायत समाजातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.