जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
खासदार छत्रपती संभाजी राजे हे मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदान, येथे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून जामखेड तालुका सकल मराठा समाज यांच्यावतीने जामखेड येथे उद्या सोमवार दि .२८ / ०२ / २०२२ रोजी सकाळी १०:०० ते ५:०० वाजे दरम्यान तहसील कार्यालय जामखेड येथे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण अंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित हजर रहावे. असे आवाहन जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाचे तालुका समन्वयक मंगेश (दादा) आजबे यांनी केले आहे