जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल कन्स्ट्रक्शन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत लहान गटात श्रावणी जाधव तर समूह गटात रायगड येथील जय हनुमान कला मंच रायगड यांनी प्रथम क्रमांक मिळविला.या नुत्य स्पर्धेत राज्यासह जिल्हातील सुमारे २०० स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. यावेळी बारामती अग्रोच्या विश्वस्थ सुनंदाताई पवार यांनी कर्यक्रमाला उपस्थित राहून कलाकरांना दादा दिली.
ग्रामीण भागातील व महाराष्ट्रातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा या हेतुने येथिल राहुल कन्स्ट्रक्शन व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दि १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य राज्यस्तरीय वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन जामखेड येथे करण्यात आले होते. यावेळी सकाळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर प्रा सचिन गायवळ,उद्योजक हवादादा सरनोबत बापूसाहेब कार्ले,प्रदीप टाफरे,सनी सदाफुले संतोष फिरोदिया,शरद शिंदे,आलेश जगदाळे,विभीषण कदम गणेश पवार,लक्ष्मण कानडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्नेने उपस्थित होते.
यावेळी नृत्य सादरीकरणातील लक्षवेधी दिलखेचक अदाकारी,धमाल नृत्याला मिळणारी तरुणाईसह महिलांची उत्स्फूर्त दाद आणि संगिताच्या तालावर बालगोपाल कलाकारांचे थिरकणारी पावलं,जामखेडकरांसाठी आनोखी पर्वणीच ठरली होती.महाराष्ट्रातील लातुर पुणे पनवेल बीड नगर,रायगड,नगर येथील जवळ जवळ २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या लहान गटातील निकाल पुढील प्रमाणे लागला.राज्यस्तरीय लहान गटात, प्रथम क्रमांक, श्रावणी जाधव रत्नापूर , व्दितीय क्रमांक,आतिष गिरी बीड , तृतीय क्रमांक वृषाली लहाने जामखेड ,चतुर्थ क्रमांकअथर्व जाधव बीड तर समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षीस रायगड येथील जय हनुमान कला मंच,व्दितीयक्रमांकाचे ११ हजाराचे बक्षीस संस्कृती ग्रुप बीड,तृतीय क्रमांकाचे ७ हजाराचे बक्षीस G N D ग्रुप पुणे,चतुर्थ क्रमांकाचे २ हजाराचे बक्षीस अपोसस्टार ग्रुप जामखेड या स्पर्धाकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक रोख रक्कम देण्यात आले या स्पर्धेला परीक्षक म्हणून नृत्य शिक्षिका शीतल परदेशी या होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीधर सिध्देश्वर, पत्रकार ओंकार दळवी,निलेश दिवटे,अविनाश बोधले,रजनीकांत साखरे जाकीर शेख,गेणेश हगवणे राहुल कन्ट्रक्शन,मनसेच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.




