Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे खर्डा किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीकामासाठी 54.58 लाख रुपयांच्या...

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे खर्डा किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीकामासाठी 54.58 लाख रुपयांच्या वित्तीय मान्यता मिळाली!

0
231
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
 जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ला येथे असलेल्या राज्य संरक्षित स्मारकांचे जतन व दुरुस्ती कामासाठी राज्य सरकारकडून 4 कोटी 84 लाख रुपये एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रकास यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. या स्मारकाचे काम सध्या प्रगतीपथावर असून जवळपास 3 कोटी रुपयांचे काम खर्डा किल्ला येथे पूर्ण करण्यात आले आहे.
दरम्यान, या स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी 54.58 लाख रुपयांना वित्तीय मान्यता मिळावी यासाठी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे सतत पाठपुरावा करत होते. तसेच त्यांनी याबाबत संबंधित विभागाकडे वेळोवेळी हा मुद्दा लाऊन धरला होता. अखेर आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाच्या विचाराधीन असलेल्या या बाबीस राज्य सरकारकडून वित्तीय मंजूर देण्यात आली आहे. त्यानुसार आता खर्डा किल्ला येथील स्मारक दुरुस्ती व जतन करण्यासाठी 54 लाख 58 हजार 478 रुपये एवढ्या रकमेस वित्तीय मान्यता मिळाली आहे.
मतदारसंघात सतत विविध प्रकारे राज्य सरकारतर्फे निधी उपलब्ध करून विकास कामे मार्गी लावणे व शासकीय मदत जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आमदार रोहित पवार यांच्याकडून केले जात आहे. तसेच खर्डा व परिसरात विविध विकासकामांसाठी आमदार रोहित पवार हे सतत प्रयत्नशील आहेत आणि टप्प्याटप्प्याने परिसरातील विकास होत असताना पाहायला मिळतोय, त्यामुळे नागरिकांकडूनही त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!