“अमृत जवान सन्मान दिवस ” जामखेड तालुक्यात साजरा 

0
252
जामखेड न्युज – – – – 
                         माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकानी देशासाठी प्राणाची बाजी लावून देशाची सेवा केली आहे व करत आहेत, त्यांची सेवा आणि समपर्ण विचारात घेता सर्व सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्याचा उचित सन्मान करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंब व कार्यरत सैनिक यांचे विविध विभागाकडील शासकीय कामे जलद गतीने व प्राधान्याने निर्गत करण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या संकालापानेतून जिल्ह्यात “अमृत जवान सन्मान अभियान २०२२” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    सदर अभियान हे दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ पासून दिनांक २३ एप्रिल २०२२ या ७५ दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर १ समिती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बनविण्यात आली आहे. समिती बैठक आठवड्याला घेण्यात येणार असून त्यामध्ये प्राप्त झालेल्या मागणी च्या अनुषंगाने कार्यवाहीचा आढावा प्रत्येक महिन्याचा ३ रया सोमवारी घेतला जाणारा आहे.
त्यानुषंगाने आज “अमृत जवान सन्मान दिवस” तहसील कार्यालय जामखेड येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या सुरवातीला कोविड कालावधीत प्रशासनाला मदत करणाऱ्या माजी सैनिकांचा प्रशास्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर  दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ ते २० फेब्रुवारी २०२२ अखेर जे विविध  विभागाचे अर्ज प्राप्त झाले होते त्यावर सर्व विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.या कालावधीत एकूण २५ अर्ज प्राप्त झाले होते  त्यापैकी १६ अर्जावर कार्यवाही पूर्ण झाली असून ९ अर्ज सुनावणीमुळे प्रलंबित आहेत.
सदर कार्यक्रमास तहसीलदार जामखेड योगेश चंन्द्रे, गटविककास अधिकारी प्रकाश पोळ,  मुख्याधिकारी  मिनींनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे उपअभियंता योगेश कासलीवाल, माजी सैनिक संघटनेचे प्रमुख डोके साहेब, प्रहार कल्याण संघटनेचे सदस्य उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देढे यांनी केले तर आभार मनोज भोसेकर निवासी नायब तहसीलदार जामखेड यांनी केले.
  या कार्यक्रमाबद्दल सैनिकांनी प्रशासनाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here