जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
जामखेड तालुका शिक्षकेतर संघटनेची मिटींग आज दि 8/1/22(शनिवार)रोजी ल.ना.होशिंग विघालय जामखेड येथे पार पडली. या वेळी केदारेश्वर विद्यालयाचे (जातेगाव)भाऊसाहेब श्री कमलाकर गायकवाड हे 31/12/2021रोजी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल जिल्हा संघटना खजिनदार श्री हराळे भाऊसाहेब (अ.नगर)व जामखेड तालुका शिक्षकेतर संघटना वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जामखेड तालुका अध्यक्ष श्री कोळी भाऊसाहेब यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार जिल्हा खजिनदार श्री हराळे भाऊसाहेब व तालुका संघटनेचे माजी सचिव श्री होशिंग भाऊसाहेब व तालुक्याच्या माजी अध्यक्ष श्री संतोष देशमुख व तालुका सचिव श्री धनवडे भाऊसाहेब यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
ADVERTISEMENT 

यावेळी अधिवेशन संदर्भात चर्चा करण्यात आली या जिल्हा खजिनदार श्री विजय हराळे जामखेड तालुका अध्यक्ष श्री कोळी भाऊसाहेब व तालुका सचिव श्री धनवडे भाऊसाहेब व माजीसचिव श्री होशिंग भाऊसाहेब माजी तालुका अध्यक्ष श्री संतोष देशमुख श्री कमलाकर गायकवाड श्री संतोष रमेश देशमुख श्री उमाकांतजी कुलकर्णी श्री अशोक झेंडे श्री प्रमोद बारवकर इत्यादी शिक्षकेतर संघटनेचे कार्यकर्ते हजर होते.