जामखेड न्युज – – –
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळामार्फत 12 ऑगस्ट, 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला. निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभाग आणि इतर बोर्डाच्या गुणवत्ता यादीत साताऱ्याच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. शहरी विभागातून स्वराज चव्हाण आणि इतर बोर्ड विभागातून निरंजन तोरडमल हा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे.
ADVERTISEMENT 

साताऱ्याचा शिष्यवृत्ती परीक्षेत झेंडा
शहरी विभागातून सी एस हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वडूज या शाळेचा स्वराज महादेव चव्हाण हा विद्यार्थी 98.67 गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे. तर, इतर बोर्ड विभागूतन सताऱ्यातील पोदार स्कूल मधील निरंजन तोरडमल हा पहिला आला आहे. सातारच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता पाचवीतील निरंजन राजेंद्र तोरडमल हा युवक महाराष्ट्रात प्रथम आलेला आहे त्याला 92.66 इतके मार्क मिळाले आहेत.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी
शहरी विभाग आणि इतर बोर्डाच्या गुणवत्ता यादीत साताऱ्याच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. शहरी विभागातून स्वराज चव्हाण आणि इतर बोर्ड विभागातून निरंजन तोरडमल हा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे. तर,ग्रामीण विभागातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा तळेगाव दभ. क्रमांक 2 ची विद्यार्थिनी तनिष्का जयकुमार गायकवाड राज्यात पहिली आली आहे.
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी
आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टीची विद्यार्थिनी श्रावणी संतोष धस 96.66 गुण मिळवून राज्यात प्रथम आली आहे. तर, इतर बोर्डाच्या म्हणजेच आयसीएसई आणि सीबीएसईच्या गुणवत्ता यादीत विद्यानिकेतन अकॅडमी अहमदनगरची विद्यार्थिनी प्राजक्ता दिपक चव्हाण 89.83 टक्के गुण मिळवत राज्यात पहिली आली आहे. तर,ग्रामीण विभागातून अहमदनगर जिल्ह्यातील नुतन एमवी मिरजगाव येथील उमर कालीम शेख 94.00 टक्के गुण मिळवत प्रथम आला आहे.
निरजंन तोरडमलचा शिक्षकांकडून सत्कार
सातारच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता पाचवीतील निरंजन राजेंद्र तोरडमल हा विद्यार्थी आयसीएसई आणि सीबीएसई विभागातून महाराष्ट्रात प्रथम आलेला आहे. त्याला 92.66 इतके मार्क मिळाले आहेत. या निकालानंतर शाळेतील शिक्षकानी त्याच्या घरी जाऊन निरांजनचा सत्कार केला आहे.