जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून चोंडी येथे आरटीओ वाहन परवाना चाचणी केंद्राचा उद्घाटन शुभारंभ सौ.सुनंदाताई पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी कर्जत-जामखेडचे उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, बापूसाहेब शिंदे, चोंडीचे उपसरपंच कल्याण शिंदे, माजी उपसभापती दीपक पाटील, शरद ढवळे, अमर चाऊस, सौ.सविताताई घनवट,
यश ड्रायव्हींग स्कूलचे चालक संभाजी वटाने, यादव मोटार
ड्रायव्हींग स्कूलचे मालक यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना सौ.सूनादाताई पवार म्हणाल्या की, विना परवाना वाहन चालवणे धोकादायक आहे. तसेच वाहन चालवताना रस्त्याचे व वाहनाचे नियम माहीत असणे गरजेचे आहे. त्यांनी पालकांसाठी ही विनंती केली की आपल्या मुलांना वाहन चालवण्याचे नियम माहीत असल्या शिवाय व परवाना असल्याशिवाय वाहन चालवणे धोकादायक आहे हे सांगायला पाहिजे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या चोंडी येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्याचा फायदा नक्कीच चोंडी गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना होणार आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले की, तुम्ही ही तुमच्या शेतामध्ये असे सौरऊर्जा प्रकल्प उभारू शकता व कर्जत,जामखेड तालुक्यतील नागरिकांनी परवाना मिळावा या साठी १४००० हजार अर्ज केले होते त्यातील ४५०० हजार परवाने वितरण करण्याचे काम आज पासून सुरू केले आहे. अशीही माहिती सुनंदाताई पवार यांनी दिली.
कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्तावना कर्जत जामखेड डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक शितोळे यांनी तर सूत्रसंचालन सलमान शेख यांनी केले.