जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे उत्कृष्ट वाड्मयीन ग्रंथाचे २०२० चे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. आ. य. पवार यांनी नुकतीच केली असून कथा, काव्य, कादंबरी व ललित लेखसंग्रहासाठी राजे संभाजी साहित्य पुरस्कार असून, समीक्षा व बाल साहित्यासाठी महात्मा जोतीराव फुले साहित्य पुरस्कार आहेत.
बाल साहित्य व ललित लेख संग्रहाचे पुरस्कार रोख रक्कम एक हजार, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह असे असून ,कथा, काव्य, समीक्षा, कादंबरीसाठी रक्कम रुपये दोन हजारचे पुरस्कार असल्याची माहिती खजिनदार डॉ जतीन काजळे यांनी दिली. ग्रंथ पुरस्कार याप्रमाणे…
कादंबरी: ज्ञानेश्वर जाधवर ( लाॅकडाऊन) सोलापूर,
कादंबरी: गजानन देसाई ( ओरबिन) गोवा ,
काव्यसंग्रह: प्रथमेश किशोर पाठक ( कार्पोरेट कविता) ठाणे, कथासंग्रह: प्रा.माधव जाधव ( चिन्हांकित यादीतील माणसं) हिंगोली, कथासंग्रह: सचिन वसंत पाटील ( गावठी गिच्चा) सांगली, ललित लेखसंग्रह : विश्वास वसेकर( ॠतू बरवा) पुणे, समीक्षा ग्रंथ: डॉ सोपानदेव पिसे
( वि.स.खांडेकरांची कादंबरी: एक आस्वादयात्रा) नागपूर,
बालसाहित्य: डॉ.विद्याधर बन्सोड( पिलांटू ) चंद्रपूर.
प्रथम प्रकाशन, उत्तेजनार्थ दोन
पुरस्कार: १) मालती सेमले( बालसाहित्य..बाग आम्हा मुलांची) गडचिरोली,
२) निशा डांगे ( काव्य.. मुग्धायणी) यवतमाळ,
ग्रंथ निवड समितीत प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, प्रा.विजया नलवडे, डॉ. राजाराम सोनटक्के, डॉ. गोपीनाथ बोडखे यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरण पुढील महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय कविसंमेलनात होईल अशी माहिती मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या
उपाध्यक्ष डॉ विद्या काशीद व सदस्य प्रा.मोहन डुचे यांनी दिली.