जामखेड न्युज – – –
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सौताडा येथील दत्त गड येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी कळसाची चोरी करून पोबारा केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की बीड-नगर राज्य रस्त्यावरील श्रीक्षेत्र सौताडा येथून दोन किमी अंतरावर प्रभु रामचंद्राच्या दरीच्या पश्चिमेला शिवदत्त गड हे मंदिर आहे. अध्यात्मिक कार्य करणाऱ्या भाविक, भक्त व समाजधुरिणांनी या मंदिराच्या वर सुंदर अशा कळसाची निर्मिती केली होती. भाविक भक्त मोठ्या भक्तीने याठिकाणी दर्शनासाठी येतात.
सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या शिव दत्त गड येथील या मंदिराच्या वर बसवलेला शिखरावरील कळस हे मोठ्या किमतीच्या असून ते काल रात्री अज्ञात चोरट्यांनी गायब केले. ही माहिती संबंधित गडाचे महाराज अशोक सानप यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी तात्काळ पाटोदा पोलीस ठाणे गाठत तेथे फिर्याद दिली आहे. या संदर्भामध्ये पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास पाटोदा पोलीस स्टेशन चे पी आय मनिष पाटील यांच्या मार्गदर्शना खाली बीट अंमलदार सोनवणे तांबे मेजर हे करत आहेत आहे.
रम्यान, शिवदत्त गडावरील या मंदिराच्या कळसाच्या चोरीमुळे भाविक भक्तांमध्ये दुःखाची छाया पसरली असून तपास लावून चोरटे पकडावेत तशी मागणी करण्यात येत आहे.