जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – –
जामखेड येथील पत्रकार मिठूलाल नवलाखा यांचे वडील पोपटालाल मोतीलाल नवलखा यांना आज दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री १०: ०० वा. वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी १० : ०० वाजता जामखेड येथील तपनेश्वर अमरधाम येथे करण्यात आला दुपारी सावडणे
एक खड्डा खोदून अस्ती विसर्जन करून झाड लावले
४.३० वाजता उठावणा नंतर टोपी बदलणे (दहावा) असे कार्यक्रम एका दिवसात केले.
सध्या कोरोनाचे सावट असल्याने, एस टी. महामंडळाचा संप, या सर्व अडचणींचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी एका दिवसात सर्व कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला नवलाखा परिवाराने यास संमती दिली व एका दिवसात सर्व कार्यक्रम केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मिठूलाल, संतोष व सचिन अशी तीन मुले, दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच त्यांना सर्व स्तरातून श्रध्दांजली अर्पण केली जात आहे.