जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
” संविधान” हे कोणत्याही देशाच्या बांधनीचा पाया असतो,भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला एकता,न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे आदर्श भारतीय संविधान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याला दिले.असे प्रतिपादन अरणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सदाफुले यांनी केले.
ADVERTISEMENT

अरणगाव येथील अरण्येश्वर विद्यालयात आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात डॉ. सदाफुले पुढे म्हणाले कि भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे त्यामुळे अशा कार्यक्रमांचे विद्यालयात आयोजन करून एक स्तुत्य उपक्रम विद्यालयाने घेतला यासाठी विद्यालयाचे त्यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमात प्रथम भारतीय राज्यघटना म्हणजेच “संविधान” व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे डॉ. सदाफुले आणि पर्यवेक्षक श्री हरिभाऊ कोल्हे सर व ज्येष्ठ शिक्षकांनी पुष्प अर्पण करून पुजन केले.
सुत्रसंचलन श्री दिपक तुपेरे यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. दत्तात्रय कसबे यांनी केले.
अनेक भाषा, हजारो परंपरा , अनेक धर्म , पंथ , संस्कृती
एकत्रितपणे नांदविणे व गाव , तालुका ,जिल्हा ,राज्य यांची मूठ बांधून माणसाला माणसा सारखे जगणं बहाल करणे हे केवळ शक्य झाले ते फक्त भारतीय संविधानामुळेच असे मत श्री विजय करपे सर यांनी व्यक्त केले .
जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात कायदा व सुव्यवस्था हि केवळ संविधानामुळेच टिकून आहे त्याच बरोबर विविधतेने नटलेल्या या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे अधिकार ,हक्क व सुरक्षिततेची हमी राज्यघटनेमुळे अबाधित आहे ,असे मत श्री.गोकुळ गंधे सर यांनी शिक्षक प्रतिनिधी म्हणून बोलताना व्यक्त केले.
श्री. प्रमोद कारखिले व श्री दत्तात्रय कसबे यांनीही संविधानाच्या माध्यमातून चाललेला भारतीय राज्यकारभार स्पष्ट केला.
“माझे संविधान, माझा अभिमान” या कार्यक्रमाअंतर्गत विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षक श्री. हरिभाऊ कोल्हे सरांनी अभिनंदन केले.
श्री. दिपक तुपेरे सरांनी व उपस्थित सर्वांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले .
शेवटी श्री. नवनाथ आडे सरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.