संविधान दिनाचा जामखेड तालुका प्राथ शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचा स्तुत्य उपक्रम

0
203
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – – 
संविधान दिनाच्या निमित्ताने जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या वतीने जामखेड येथील संविधान स्तंभाला अभिवादन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करून धम्मगिरी बुद्ध विहार गिरलगाव ता भूम जि उस्मानाबाद यांना विवाह व इतर कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी स्वयंपाकाची भांडी देण्यात आली. शिक्षकांच्या दानशूरपणा बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
                    ADVERTISEMENT
   
   वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी लागणारी भांडी
१)लोखंडी कढई १,  २) स्टील बकेट ४,  ३)स्टील पाटी ५,  ४) अल्युमिनियम मोठी परात 1,
 ५) अल्युमिनियम खोन मोठा   1,
६) अल्युमिनियम चाळणी मोठी
 इत्यादी साहित्य अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ विश्वस्त / बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांच्या कडे देण्यात आले.
धम्मगिरी विहारात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या लोकोपयोगी उपक्रमासाठी शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाने पुढे येऊन मदत केल्याबद्दल सर्वत्र शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.
   यावेळी किसन वराट केंद्र प्रमुख, संतोष राऊत केंद्र प्रमुख, मजीद शेख केंद्र प्रमुख, पांडुरंग मोहळकर केंद्र प्रमुख, एकनाथ (दादा) चव्हाण, अर्जुन पवार स , दत्तात्रय यादव सर, अनिल भोसले सर , सतीश सदाफुलें , गोरोबा टॉकीजचे संचालक विनायक राऊत साहेब, जामखेड चे माजी सरपंच संजय भोसले ,कृ उ बा स संचालक सागर सदाफुलें, अनिल सदाफुलें प्रा राहुल आहेर सर , संदेश घायतडक, रत्नाकर सदाफुलें, शेखर घायतडक, सचिन सदाफुलें ,  सुरेखा सदाफुलें ,सुरेखा रत्नाकर सदाफुलें  सह अनेक मान्यवर उपस्तीत होते.
शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या या समाजउपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here