प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणी मंत्री गडाख म्हणाले – – –

0
194
जामखेड न्युज – – – 
प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणावरून भाजपाने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना घेरण्याचा प्रयत्न केला तेव्हा मंत्री गडाख यांनी सर्व आरोपांवर प्रतिउत्तर दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आत्महत्या दुर्दैवी आहे पण आत्महत्येशी माझा कसलाही संबंध नाही तो माझ्या भावाच्या काॅलेज मध्ये नोकरीस होता गेल्या सहा महिन्यांपासून माझा भाऊ हाॅस्पिटलमध्ये मृत्युशी झुंज देत आहे. कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशी करावी माझा कसलाही संबंध आढळल्यास वाट्टेल ते शिक्षा द्या!! पण माझा काहीही संबंध नसताना माझे राजकारण का संपवता असा संतप्त सवाल केला आहे.
                            ADVERTISEMENT
प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. ‘प्रतिक काळेची आत्महत्या दुर्दैवी आहे. तो काही माझा स्वीय सहाय्यक नव्हता पण विरोधक केवळ राजकीय हेतूने आरोप करत आहे, त्यांनी एक तरी पुरावा द्यावा’ असं म्हणत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य यांना फटकारून काढले.
                   ADVERTISEMENT
प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणावर शंकराव गडाख यांनी आपली भूमिका मांडत भाजप नेत्यांचा खडेबोल सुनावले आहे.’माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. केशव उपाध्याय यांनी केलेले आरोप राजकीय हेतूने आहेत. सदर प्रकरणाची कोणत्याही समितीने सखोल चौकशी करावी आणि जर दोषी आढळून आलो तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याचंही शंकरराव गडाख यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here