कोकण, मराठवाडा ते दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

0
182
जामखेड न्युज – – – 
 भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं पुढील पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. कमोरिन आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र आता लक्षद्वीप आणि अरबी समद्राकडे सरकलं आहे. येत्या तीन दिवसात हवामान प्रणाली तीव्र होण्याची शक्यता असल्यानं पुढील चार पाच दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अधिका माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाकडून अ‌ॅलर्ट जारी
पुढचे 4-5 दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट जारी
3 नोव्हेंबर:
रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.
4 नोव्हेंबर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
5 आणि 6 नोव्हेंबर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
7 नोव्हेंबर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here