जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
ग्रामीण विकास केंद्र, संचालित निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, वंचित मुलांना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. संभाजी गायकवाड साहेब, तसेच जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.प्रकाशजी पोळ साहेब, जामखेड तालुक्याचे नायब तहसीलदार मा.मनोज भोसेकर साहेब यांच्या हस्ते निवारा बालगृहातील अनाथ, निराधार मुलांना दिवाळीनिमित्त कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहा गावचे प्रसिद्ध उद्योजक मा.श्री.प्रा. महादेव बांगर सर होते.
ग्रामीण विकास केंद्र ही संस्था तालुक्यातील मोहा फाटा या ठिकाणी निवारा बालगृह नावाचा प्रकल्प चालवते या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, लोककलावंत, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटके-विमुक्त, आदिवासी घटकातील 65 मुला मुलींच्या शिक्षणासाठी हे बालगृह चालवले जात असून ,हे बालगृह विनाअनुदानित तत्वावर चालवले जाते. हा प्रकल्प जामखेडच्या वैभवात भर टाकणारा शैक्षणिक प्रकल्प आहे. माणसाचा उत्साह वाढवणारा प्रकल्प आहे.
ADVERTISEMENT

यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आपल्या मनोगतात भविष्यामध्ये या बालगृहातून एक नाही तर अनेक प्रशासकीय अधिकारी निश्चित तयार होतील असा मनोदय व्यक्त केला. ज्या ज्या वेळी मी येथे येतो त्या वेळी येथे मला एक नवीन बदल बघायला मिळतो अस ते म्हणाले.
ADVERTISEMENT

तसेच जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाशजी पोळ यांनी , या आश्वासक निवारा प्रकल्पाचे कौतुक केले व भविष्यात या प्रकल्पाला शक्य तेवढी जास्त मदत करन्याचे आश्वासन दिले. शिक्षणाविषयी बोलताना त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वीची शिक्षणव्यवस्था आणि बाबासाहेबानंतरची शिक्षणव्यवस्था खूप बदलली आहे तेव्हा समाज किंवा व्यक्ती बदल घडून आणायचा असेल तर शिक्षण हेच साधन आहे तेव्हा सर्वांनी बाबासाहेबांचा आदर्श घेतला पाहिजे अस मत त्यांनी व्यक्त केल.
अध्यक्षीय भाषणात मोहा गावचे प्रसिद्ध उद्योजक प्रा. मा. महादेव बांगर सर यांनी संस्थेला भविष्यात सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. व निवारा बालगृहातील मुलांच्या शिस्तीचे व शिक्षणाचे त्यांनी कौतुक केले. व निवारा बालगृहाने मोहा गावचीच नव्हे तर तालुक्याची शोभा वाढवली आहे अस ते म्हणाले.
यावेळी ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अँड.डॉ. अरुण जाधव यांनी आपल्या मनोगतात भविष्यामध्ये ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहामध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा निर्माण करू असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापूसाहेब ओहोळ यांनी दिली. या प्रकल्पाद्वारे या भागातील आदिवासी,भटके, वंचीत, निराधार लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात नक्कीच आम्ही घेऊन जाऊ अस ते म्हणाले. तसेच भविष्यामध्ये वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या धर्तीवर ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातुन दर्जेदार शाळा निर्माण करणार असल्याच त्यांनी जाहीर केल.
बालगृहातील विद्यार्थी अनुमती, नीता, ओम, प्रणय, दिपक यांनी इतिहासाचे रंगरूप हे स्वागतगीत गाऊन मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच बालगृहातील विद्यार्थी साई काळे, विशाल शिंदे यांनी आपल्या नृत्यकलेने पाहुण्यांचे मनोरंजन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण सर यांनी केले.
यावेळी जामखेड नगरपरिषेदेचे नगरसेवक अमित जाधव, श्री कोळेकर सर, महादेव डुचे सर, संस्थेच्या सचिव उमाताई जाधव, आदिवासी नेते विशाल पवार,वंचीत बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष आतिष पारवे, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजिनाथ केसकर, तरडगावच्या सरपंच संगीताताई केसकर, जामखेड पोलीस स्टेशनचे ढेरे दादा, द्वारकताई पवार, प्रकल्प समन्वयक सचिन भिंगारदिवे, राकेश साळवे, राजू शिंदे, तुकाराम शिंदे तर , वैशाली मुरूमकर, मच्छींन्द्र जाधव, रोहित पवार, तुकाराम पवार, अनिल सावंत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.