जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – –
श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्था संचलित नवज्योत प्रकल्पात दिपावली निमित्त पारख परिवाराच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय वाघ होते. यावेळी बोलताना संजय वाघ म्हणाले आज कुणालाही वेळ द्यायला टाईम नाही वृद्धाश्रमातील वृद्धांचे स्वतःचे मुले पाहत नाहीत, परंतु या संस्थेचे संस्थापक संतोष गर्जे हे स्वतः लक्ष देऊन या वृद्धांकडे आणि निराधार ,ऊसतोड मजूर, कोरोना ग्रस्त, गरजु, गोरगरीब मुलांच्या कडे लक्ष देतात खूप मोठी बाब आहे या सर्वांना कधीही हॉस्पिटल बाबत काही मदत लागल्यास मला सांगा मी सर्व औषधे मोफत पूर्वत जाईन आणि पारख परिवारांनी जो हा उपक्रम केला त्यांचे खरोखर आपण आभार मानले पाहिजेत.
ADVERTISEMENT 

तसेच यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले बऱ्याच जणांना दिवाळी किंवा सणाच्या वेळी अडचणी येतात घरात कोणी व्यक्ती मयत झाले असल्यास तो सण साजरा करता येत नाही परंतु माझ्या मते जरी आपल्याला तो सण साजरा करता नाही आला तरी आशा गरजु लोकांना दिवाळी खाऊ घालून साजरा करावा म्हणजे खरी दिवाळी साजरी होईल असे संजय कोठारी म्हणाले यावेळी पारख परिवारांचा संतोष गर्जे यांनी सत्कार सन्मान केला.
ADVERTISEMENT

स्व. सुंदरलालजी पारख ,स्व मोतीबाई पारख आणि स्व.सोहनलाल पारख यांच्या स्मरणार्थ जामखेड शहरालगत नवज्योत प्रकल्प वृद्धाश्रम आणि लहान बालकांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक संजय वाघ ,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, अरविंद पारख, रोहित पारख, निलेश पारख, अमित पारख आणि संस्थेचे संचालक संतोष गर्जे उपस्थित होते.