जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देत आसताना ड्रायव्हींग स्कुल मधिल एका तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी जामखेड शहरातील ओम ड्रायव्हींग स्कूलच्या चालका विरोधात विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचे ओम ड्रायव्हींग स्कुल चे वहान देखील पोलीसांनी जप्त केले आहे. त्यामुळे जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून ओम ड्रायव्हींग स्कूल आहे. या ठिकाणी मुली व महिलांना वहान शिकवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या स्कुल मध्ये ड्रायव्हींग शिकण्यासाठी एका तरुणीने प्रवेश घेतला होता. दि 23 रोजी नेहमी प्रमाणे सदर तरुणी ही दुपारी बारा वाजता ड्रायव्हींग शिकण्यासाठी आली होती. यावेळी ओम ड्रायव्हींग स्कूलचा मालक व चालक संदिप झुंबर गर्जे याने सदर तरूणीला ड्रायव्हींग शिकवण्यासाठी स्काँर्पीओ गाडी नंबर MH-16-BY-5439 या गाडीतून जामखेड पंचायत समिती ते गौरी हाँटेल जवळील पटांगण परिसरात गाडी शिकवत असताना स्टेअरिंग पकडण्याच्या बहाण्याने तरूणीचा विनयभंग केला.
या नंतर सदर तरुणीने जामखेड पोलीस स्टेशनला या बाबत फीर्याद दाखल केली त्या नुसार या ओम ड्रायव्हींग स्कूलचा मालक संदिप झुंबर गर्जे याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित स्काँर्पीओ गाडी जप्त केली आहे. सदर आरोपीला जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
ड्रायव्हींग स्कूलच्या चालकाने असा प्रकार केल्याने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.