जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
भाजपा हे असे वाशिंग मशिन आहे की, त्यात कोणतेही कापड टाकले तरी स्वच्छ होऊनच येते. कारण ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांना ईडी, इन्कम टॅक्स यांची भीती नाही ते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होऊन बाहेर फिरत आहेत असे मत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने जामखेड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, निरीक्षक माणिकराव मोरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, जामखेड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, युवक काँग्रेस कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले, ज्येष्ठ नेते भानदास बोराटे, महिला तालुकाध्यक्ष ज्योतीताई गोलेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष देविदास भादलकर, जिल्हा सचिव सुनील शिंदे, तात्या काळे, युवक चे तालुकाध्यक्ष शिवराजे घुमरे, तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात, युवक शहराध्यक्ष विक्रांता अब्दुले, अल्पसंख्यांक अध्यक्ष फिरोज पठाण, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जावेद शेख, किसान काँग्रेस अध्यक्ष गौतम पवार, सेवादल अध्यक्ष राजू पचारे, मागासवर्गीय अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, चंद्रकांत उगले, ससाने, विजय गव्हाळे, ओबीसी काँग्रेस शहराध्यक्ष अमोल खेत्रे, व्यापारी काँग्रेस अध्यक्ष निलेश माने, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी युवकचे कार्यकारी जिल्हाअध्यक्ष राहुल उगले यांनी प्रास्ताविक करताना मतदारसंघात पडत्या काळात निष्ठावंत कार्यकर्त्यानी पक्ष जिवंत ठेवला असून आपण या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज आहे. गेली 25 वर्ष विरोधात असताना काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. पक्षातील काही नेत्यांनी कधीही पक्ष बदल केला नाही ते निष्ठावंतच राहिले आहेत, आगामी निवडणुकांमध्ये योग्य नियोजन केले तर मोठे यश मिळू शकते, आम्ही नगर परिषद सर्व जागांची तयारी करतो आहोत असे जाहीर केले. निष्ठावंतानी पक्षाची मोठी ताकद तालुक्यात उभी केली आहे, त्यामुळे आगामी काळात पक्ष अधिक जोमाने वाढेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले की, गेली 25 वर्ष तालुक्यातील सत्ता भाजपाच्या ताब्यात असताना काँग्रेस पक्ष मजबूत राहिला याचे श्रेय तुम्हा सर्वांना जाते, हा चळवळीचा तालुका आहे. ज्याच्या मागे माणसे आहेत, जो कामासाठी पळपळ करतो त्याच्या मागे लोक राहत असतात, तीन वर्षांपूर्वी आलो होतो. सर्वांनी जबाबदारी व प्रमाणिक पणे कामे केली तर नक्कीच यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना तांबे म्हणाले की,
समीर वानखेडे यांच्याविषयी विचारले असता ते म्हणाले की महाराष्ट्र पोलीसांनी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे खरेच जर वानखेडे दोषी असतील तर कारवाई गरजेची आहे काॅग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे त्यामुळे मेळावे सुरू आहेत.
यावेळी नवनियुक्त पदाधिकार्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.