जामखेड येथे राज्यस्तरीय चांदणझुला कविसंमेलन उत्साहात संपन्न

0
222

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
  गेल्या दीड वर्षांपासून लाॅकडाउन मुळे घरात बसून असलेल्या जामखेडकरांना राज्यातील नामवंत कवींच्या बहारदार कवितांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेता आला मराठी साहित्य परिषदेच्या चांदणझुला राज्यस्तरीय
कविसंमेलन उत्साहात संपन्न झाले. राज्यातील अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित चांदणझुला राज्यस्तरीय कवी संमेलन शनिवारी सायंकाळी उत्साहात संपन्न झाले यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, धनराज पवार, संजय वारभोग, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, बबन काशिद, प्रा. मधुकर राळेभात, गुलाब जांभळे, संजय वराट, अॅड हर्षल डोके, डॉ. विद्या काशिद, प्रा. आ. य. पवार, डॉ. जतिन काजळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब सौदागर, हरिश्चंद्र पाटोळे, हनुमंत चांदगुडे, शंकर वाडेवाले, मोहन डुचे, कुंडल राळेभात, नामदेव राळेभात, लक्ष्मण ढेपे, सृजन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते हरीभाऊ काळे, बासरी वादळ अनिल अडसुळ, डॉ. सुरेश काशिद, रमेश अडसुळ, बी. ए. पारखे, तांबे सर, रंगनाथ राळेभात, अवधूत पवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, साहित्याची चांगली मेजवानी जामखेडकरांना द्यावी या उद्देशाने हे कवी संमेलन आयोजित केले आहे.
 या कार्यक्रमात पत्रकार सुदाम वराट व दिपक देवमाने यांना सपत्नीक राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, अशा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशासन नेहमीच सहकार्य करेल यावेळी त्यांनीही एक कविता सादर केली
  ” समुदर नही एक नदी तो होनी चाहिये ये मेरे दोस्त जिंदगी तेरे शहरमे कही तो होनी चाहिये”
पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी कवीबद्दल बोलताना सांगितले की, “जो न देखे रवी तो देखे कवी”
शंकर वाडेवाले व हनुमंत चांदगुडे यांनी – सुत्रसंचलन करताना सांगितले की कविता सोपी नसते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध गितकार, संगितकार व कवि
बाबासाहेब सौदागर होते त्यांनी ” गारठ्याच्या रातीला थांब सोबतीला पाखरा” अशी बहारदार कविता सादर केली.
हरिश्चंद्र पाटील यांनी – आभाळ गेलं फाटून तुम्हीच सांगा जगाचय कसं शेती म्हणजे मृगजळाचे पाणी शेती विषयक कविता सादर केली
पाहुणी – कसे सांगू सजणे तुला डोली भरते पाणी
हनुमंत चांदगुडे – यांनी आठवीला अभ्यासक्रमात असणारी आळाशी कविता सादर केली तसेच
माय बापाच्या सुखाची लेक आहे आरसा नक्षीदार रांगोळी ती अंगणाचा वारसा लेक माझ्या काळजाच्या दावणीची कुट्टी
शंकर वाडेवाले – माय माती – माती होई पाटा देह माईचा चंदन
सये बाई – जीव सये मी ग तुला लावलाय बाई पापणीची कोर तुझ्या चाललाय मोर
नागेश शेलार – पुन्हा
आता पुन्हा त्या चांदण्याचे नाव काढायचे नाही
कुठल्याच गावचे रस्ते सरळ राहिले नाही नदीचे पाणी निर्मळ राहिले नाही  माणूस होण्याची लायकी नाही ते देव होऊन बसले
इंद्रकुमार झांजे – कोरोनावर वास्तववादी कविता सादर केली.
आनंद साळवे – खेळवून सावलीचा हा जीवाच्या काहिलीचा रानोमाळी झुंजणाऱ्या माय माऊलीचा
अजय भराटे – ऊस तोड कामगारांची कविता
आम्ही नगऱ्याची पोर रायचो कोपीत  ही कविता सादर केली
डॉ. संजय राऊत – रावण दहण
 या कवयित्रींनी आपापल्या कविता सादर केल्या.
हरीभाऊ काळे – मस्तक माझ्या पायावरी वारकरी संतांच्या अभंग गायन केले
    अशा प्रकारे बहारदार कविता सादर झाल्या
  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संतोष सरसमकर यांनी मानले
   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वदर्शन न्युजचे संपादक गुलाब जांभळे, अवधूत पवार व कुंडल राळेभात यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here