साकत घाटात मालट्रकची पलटी

0
213
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
बीड वरून श्रीगोंदे येथे सरकी घेऊन जाणारा ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने साकत घाटात मालट्रकची पलटी झाली सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली झाली नाही फक्त सरकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
     पांगरी ता. शिरूर येथील आजीनाथ दहिफळे यांच्या मालकीची ट्रक एम एच 23 डब्ल्यू  9100 क्रमांकाच्या ट्रक मध्ये सरकी अकरा टन माल भरून श्रीगोंदे येथे चालली होती चालक भागवत गर्जे महासांगवी ता. पाटोदा हे होते. बीड वरून पाटोदा व साकत मार्गे जामखेड कडे चालली होती साकत घाटात पहिल्या वळणावर अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रक खोल दरीत जाणार हे लक्षात येताच चालकांने प्रसंगावधान राखून ट्रक वळवली त्यामुळे झोला बसून ट्रक रोडच्या कडेला पलटी झाली खोल दरीत जाण्या पासून वाचली मोठा अनर्थ टळला.
     ट्रक पलटी झाल्यावर साकत जामखेड रस्त्याने जाणारे प्रवासी पत्रकार सुदाम वराट, प्रकाश मुरुमकर, राहुल कोल्हे, राजेंद्र मोहिते यांनी मदत करत चालकास बाहेर काढून ताबडतोब मालकाला फोन लावला क्रेन मागवले तसेच सरकी भरण्यासाठी दुसरी ट्रक मागवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here