सुदाम वराट यांना मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार प्रदान

0
229

जामखेड प्रतिनिधी

               
    गेल्या बारा वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडून मार्गी लावले त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत मराठी साहित्य परिषदेने त्यांना राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्काराने सन्मानित केले. यामुळे सुदाम वराट यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
     दि. २३ रोजी प्रसिद्ध कवि व संगितकार बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कवि संमेलन जामखेड येथे संपन्न झाले यात सुदाम वराट यांना सपत्नीक पत्ररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, प्रा. मधुकर राळेभात, गुलाब जांभळे, आ. य. पवार, डाॅ. विद्या काशिद, कुंडल राळेभात यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
       सुदाम वराट यांनी २००८ मध्ये पत्रकारितेला सुरूवात केली अनेक प्रश्नांना वाचा फोडत ते मार्गी लावले कडभनवाडी, पिंपळवाडी येथिल विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत यावे लागते. शिक्षणासाठी चिमुकल्यांची धडपड चिखल तुडवत रोजचाच प्रवास अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या याची दखल घेत दोन्ही वाड्यासाठी डांबरी रस्ते तयार झाले तसेच साकत येथिल नदीवर पुल नसल्याने पुर आल्यावर जीवघेणा प्रवास करावा लागत होता जीवघेणा प्रवास या नावाखाली बातमी मुळे तो मंजूर होऊन मोठा पुल तयार झाला
      २०१०-११ मध्ये शालेय पोषण आहार योजनेत मोठय़ा प्रमाणावर निकृष्ट दर्जाचा धान्याची माल येत होता खराब झालेले सोयाबीन पीठ, भुंगे लागलेले हरभरे, एक्सपायरी झालेले तेल अशा प्रकारे मालाचा पुरवठा होत होता त्यावेळी विद्यार्थ्याच्या आरोग्याशी खेळ, शालेय पोषण आहारात निकृष्ट माल अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने संपुर्ण राज्यातील शालेय पोषण आहारातील सोयाबीन पीठ बंद झाले तसेच चांगल्या प्रतिचा माल उपलब्ध होऊ लागला.
    २०१५ मध्ये फोनवर गॅस बुकिंग करताना पंतप्रधान मोदी यांची पस्तीस मिनिटांची जाहिरात लागत असे त्यावेळी जाहिरात पंतप्रधानांची बील ग्राहकांच्या माथी अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली या बातमीमुळे आठ दिवसात जाहिरात बंद झाली संपुर्ण देशातील प्रत्येक ग्राहकांचे गॅस बुकिंग करतानाचे पस्तीस पैसे वाचले.
     पिंपळवाडी, कडभनवाडी येथे बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले बातम्या प्रसिद्ध केल्या दोन्ही वाड्यासाठी बस सुरू झाली. तसेच परिसरातील अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या त्यामुळे वेळोवेळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशा प्रकारे अनेक प्रश्न सुदाम वराट यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सोडलेले आहेत. याच सर्व कार्याचा गौरव म्हणून मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पत्ररत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here